मुंबई, 19 एप्रिल : मोठी बातमी समोर येत आहे. अखेर रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील मिळाला आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार पुढच्याच आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या दौऱ्यामध्ये मंत्रिंमंडळ विस्ताराला परवानगी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार हा 23 किंवा 24 मेला होण्याची शक्याता आहे.
या नेत्यांची लागणार लॉटरी
मंत्रिपदासाठी शिंदे गट, भाजपमधील अनेक आमदार देव पाण्यात घालून बसले आहेत. त्यातील काहींना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. ज्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, अशा आमदारांची नाव पुढे आली आहेत. ज्यामध्ये 1) भरत गोगवले ( जलसंधारण), 2) संजय शिरसाठ ( परिवहन किंवा समाजीक न्याय मंत्री ), 3) प्रताप सरनाईक( गृहनिर्माण मंत्रालय ) , 4) बच्चू कडू (दिव्यांग विकास मंत्री), 5) सदा सरवणकर, 6) यामिनी जाधव, 7) अनिल बाबर आणि चिमन आबा पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
राष्ट्रवादीच्या बाल्लेकिल्ल्याला भाजप लावणार सुरुंग? फडणवीस लागले कामाला, समोर आला मास्टर प्लॅन
शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला होता. गेल्या आठवड्यात न्यायालयानं अपात्रेसंदर्भात निर्णय दिला आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.