चूरू, 18 एप्रिल : आपले शौक पूर्ण करण्यासाठी चोरीच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या, वाचल्या आणि ऐकल्या असतील. पण राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातही एक वेगळा प्रकार समोर आला आहे. बीएससीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तरुणाई जीवनात पुढे जाण्यासाठी नवी स्वप्ने पाहत असते. हे पूर्ण करण्यासाठी, कठोर परिश्रम करते आणि त्यांच्या पालकांचे तसेच स्वतःचेही नाव मोठे करते.
पण तुम्ही कधी ऐकले आहे की, पदवीनंतर एखादा तरुण आपला महागडा शौक पूर्ण करण्यासाठी चोरी करू लागला आहे? पण असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पदवीधर चोराला पकडले आहे.
काय आहे प्रकरण –
आपले महागडे शौक पूर्ण करण्यासाठी बीएससी पास तरुण चोर बनला. डझनभर चोरी केल्यानंतर त्याने लव्ह मॅरेजही केले. जयपूर येथे राहणाऱ्या या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या 22 वर्षीय तरुण चोराचा पोलीस शोध घेत होते. आरोपींनी केवळ चुरू शहरात डझनभर चोरीच्या घटना घडवल्या.
सीआय मदनलाल बिष्णोई यांनी सांगितले की, 4 फेब्रुवारी 2022 रोजी शहरातील प्रतिभा नगर येथील रहिवासी गिरधारीलाल चोटिया यांच्या घरातून चोरट्यांनी लॅपटॉप, मोबाईल फोन इत्यादी चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला होता. यापुर्वीही शहरात रात्री एकामागून एक चोरी आणि गंडा घालण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे मदनलाल विश्नोई यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले होते. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीवरून आणि तांत्रिक सहाय्याने, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना, राउंड अप करून इशांत सिंधी, वॉर्ड 36 हॉल, जयपूर, चुरू याला जयपूर येथून अटक केली.
आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने त्याच्या साथीदारांसह चुरू शहरात गेल्या 3-4 महिन्यांत सुमारे डझनभर चोरीच्या घटना घडवल्या आहेत. चुरू व्यतिरिक्त आरोपी इशांतच्या साथीदारांनी बिसाऊ, रामगढ सेठन आणि जयपूर येथे चोरीच्या अनेक घटना घडवून आणल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी करण्यात येत असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.