मुंबई, 1 जून : सुषमा अंधारे प्रकरणात शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांना पोलिसांकडून क्लिन चिट मिळाली आहे. संजय शिरसाट यांनी आपल्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणात संजय शिरसाट यांच्याविरोधात परळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र या प्रकरणात गुन्हा दाखल करात येत नसल्याचं स्पष्टीकरण देत पोलिसांकडून शिरसाट यांना क्लिन चिट देण्यात आली. हा संजय शिरसाट यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. यावर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हटलं अंधारेंनी?
औरंगाबादच्या एका आमदाराने सवंग थिल्लर भाषा केली होती . त्यांना मी महत्त्व देत नाही. असभ्य लोकांशी मी बोलत नाही. पण राज्याचे गृहमंत्री अभ्यासू गुणी वकील आहेत. आमदाराने जी भाषा वापरली त्यामुळे स्त्री लज्जा उत्पन्न होते. तरी गुन्हा दाखल झाला नाही. आम्ही न्यायालयाकडेही दाद मागितली. शितल म्हात्रे प्रकरणात लगेच कारवाई होते, आमच्या प्रकरणात कारवाई का नाही? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
शिरसाटांचा पलटवार
दरम्यान त्यानंतर संजय शिरसाट यांनी देखील अंधारेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे आज समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आज त्या पत्रकार परिषदेत रडल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही, त्या एक चांगल्या ऍक्टर असल्याचा हल्लाबोल शिरसाट यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.