NASHIK : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांकरता 41 उमेदवार रिंगणात असून मतदानाला सकाळी सुरुवात झाली असून सकाळी दहा वाजेपर्यंत चाळीस टक्के मतदान झाले होते. अनिल आहेर, राजेंद्र देशमुख, संजय पवार, पंकज भुजबळ, जगन्नाथ धात्रक या पाचही माजी आमदारांचे महाविकास आघाडी प्रणित परिवर्तन पॅनल व शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनल या दोन्ही पॅनलमध्ये मुख्य लढत होणार आहे. शिर्डी येथे मुक्कामी असणारे उमेदवार, मतदार मनमाड येथे मतदान केंद्रावर दाखल झाले असून नक्कीच मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही रंगतदार होणार आहे. आपल्या मतदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी दोन्ही पॅनलच्या वतीने खटाटोप केल्याचे यावेळी बघण्यास मिळाले. तरी आता मतदार राजा कोणाच्या पारड्यात कौल टाकतो याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.