पुणे, 13 मे- पिंपरी-चिंचवड येथे सुरू असलेले शिवपूत्र संभाजी महाराज महानाट्य पोलिसांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. नाटकाचे मोफत पास दिले नाहीत तर नाटकाचे सादरीकरण कसे होते तर बघतो, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले. अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, यामाध्यमातून त्यांनी एक कळकळीची विनंती केली आहे.
अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेलं शिवपुत्र संभाजी हा नाटक सध्या पिंपरी चिंचवड शहरातील एच ए ग्राउंड वर आयोजित करण्यात आला आहे. नाटकाला पिंपरी चिंचवड करांचा भरघोस प्रतिसाद देखिल मिळत असून, ह्या नाटकाचे फ्री पास मिळावे म्हणून पिंपरी चिंचवड पोलिस दलातील पोलिसाने चक्क नाटकाच्या आयोजकाला दम दिल्याचं आरोप अमोल कोल्हे यांनी केला आहे. “फ्री पास दिल नाही, तर नाटक कसं होते ते मी पाहतो” असं म्हणत पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यांनी चक्क नाटकाच्या आयोजकाला दम दिल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. नाटकाच्या आयोजकाला दम दिल्याचा आरोप स्वतः अमोल कोल्हे यांनी नाटकाच्या व्यासपीठावरून केला आहे. त्यासोबतच त्यांनी गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी करावी अशी मागणी देखील केली आहे.
अभिनेत्रीला लागली लॉटरी! 6 महिन्यात दुसऱ्यांदा खरेदी केलं स्वत: नवं घर
तुमच्या शहरातून (पुणे)
एकीकडे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दिवसाढवळ्या राजकीय कार्य कर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या होत असताना, आता पोलीस किरकोळ तिकिटा साठी धमक्या देण्यात मश्गूल दिसतायत ही बाब अत्यंत निंदनीय असल्याचा संताप नागरिक व्यक्त करतायत. दरम्यान या प्रकारा बाबत आपण गृहमंत्र्यांना तात्काळ बोलणार असल्याचं कोल्हे म्हणाले.विशेष म्हणजे शिवपुत्र संभाजी या नाटकाचं उद्घाटनच माझी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं होतं, असं असताना देखील हा प्रकार घडल्याने पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विणोय कुमार चौबे हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एका कलाकाराची कळकळीची विनंती!#ShivputraSambhajiMahanatya #ShivputraSambhaji #ChhatrapatiSambhajiMaharaj #PimpriChinchwad @Dev_Fadnavis @PCcityPolice
(1/3) pic.twitter.com/LDR85uJq2x
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) May 13, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.