मुंबई, 27 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये 37 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा दारुण पराभव केला आहे. राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपरकिंग्सचा तब्बल 32 धावांनी पराभव केला असून यासह राजस्थानने यंदाच्या आयपीएलमधील 5 वा सामना जिंकला आहे.
राजस्थानमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सुरुवातीला राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालने मैदानावर तुफान फटकेबाजी करून राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. राजस्थान रॉयल्सकडून यशस्वीने 77 , जॉस बटलरने 27, संजू सॅमसन 17 , धुर्व जुरेल 34 तर देवदत्त पड्डीकलने 27 धावा केल्या. चेन्नईकडून गोलंदाजी करताना तुषार देशपांडेने २ विकेट्स आणि रवींद्र जडेजा, महेश थेक्षानाने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.
राजस्थान रॉयल्सने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स घालवून 202 धावा केल्या तर चेन्नईला विजयासाठी 203 धावांचे आव्हान दिले. परंतु असे असताना चेन्नई सुपरकिंग्सची सुरुवात खराब झाली. राजस्थानचा गोलंदाज संदीप शर्माने 6 ओव्हरमध्ये कॉनवेची विकेट घेतली. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 47, अजिंक्य रहाणेने 15, मोईन अलीने 23 धावा केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.