नाशिक, दि. १५ एप्रिल
नाशिक शहरातील अद्यापपर्यंत पहिलीच गॅबियन वॉल प्रभाग क्र -३१ मध्ये बांधण्यात आली आहे. सुधाकर बडगुजर यांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून ही संकल्पना अस्तित्वात आली. माजी विरोधी पक्ष नेते तथा शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या संकल्पनेतून अतिशय छान गॅबियन वॉलचे उदघाटन उद्या दि. १६ एप्रिल २०२२ रोजी खा संजय राऊत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून नाशिकमध्ये जास्त पाऊस पडला की नाले दुधडी भरून वाहत असतात.बऱ्याच वेळा या नाल्यांमधील पाण्याला योग्य प्रवाह नसल्यामुळे माती खचून ते पाणी रस्त्यांवर तसेच नागरिकांच्या घरात, कॉलनीत गेल्याचे आपण पहिले आहे. अशी गैरसोय होऊ नये म्हणून काही दिवस अभ्यास केल्यानंतर गॅबियन वॉलची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्याचे त्यांनी ठरविले. वॉल सोबतच तेथे आजूबाजूला इतरही गोष्टी करता येऊ शकतात ही बाब लक्षात आल्यानंतर तिथे कारंजे, ग्रीन जिम, वॉकिंग ट्रॅक यासह लहान मुलांसाठी खेळणे याही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. मुळातच गॅबियन वॉल ही दिसायला आकर्षक असते, या सुविधा तेथे उपलब्ध झाल्याने तेथील सौंदर्यात भर पडणार आहे. तसेच अशा सुविधांमुळे नागरिकांचे आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत होईल.