मुंबई, 6 एप्रिल : काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगानं शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला तर ठाकरे गटाला धक्का बसला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शिवसेना पक्ष आता अधिकृतरित्या शिंदे गटाचा झाला आहे. पक्षाचं चिन्ह आणि नाव हाती येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पक्षाच्या प्रचारासाठी जोरदार हालाचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेच्या प्रचारासाठी नवी रणनिती आखली जात आहे.
सल्लागार समितीची नेमणूक
एवढचं नाही तर शिवसेनेचा प्रचार करण्यासाठी नवी रणनिती काय असावी? हे ठरवण्यासाठी एका सल्लागार समितीची नेमणूक करण्यात येणार आहे. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांच्याकडे या सल्लागार समितीची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. नव्या शिवसेनेच्या प्रचारासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
सत्ता संघर्षाची सुनावणी
अद्यापही सुप्रीम कोर्टात राज्याच्या सत्ता संघर्षाची सुनावणी चालू आहे. शिंदे गटासाठी दिलासादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचा निर्णय हा शिंदे गटाच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळालं आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता शिंदे गटाकडून पक्षाच्या प्रचारासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत असून, प्रचारासाठी नवी रणनिती आखण्यात येणार आहे.
नवी रणनिती काय असावी? हे ठरवण्यासाठी एका सल्लागार समितीची नेमणूक करण्यात येणार आहे. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांच्याकडे या सल्लागार समितीची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.