असिफ मुरसल, प्रतिनिधी
सांगली, 26 मे : पाण्यासाठी शेतकरी आणि नाग दोघेही पडले विहिरीत पडल्याची धक्कादायक घटना सांगलीमध्ये घडली आहे. दुर्दैवाने या घटनेमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पण नागाने आपला जीव वाचवण्यासाठी चक्क शेतकऱ्याच्या मृतदेहाचा आसरा घेतला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तुमच्या शहरातून (सांगली)
मिळालेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील जिरग्याळ येथे 2 आठवड्यापूर्वी ही घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत आहे. विहिरीत पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मग मृतदेह काढण्यासाठी गेलेल्यांची पाया खालची वाळू घसरली. कारण तरंगणाऱ्या मृतदेहावर एक नाग फणा काढून बसला होता,त्यामुळे मृतदेह काढायचा कसा ? असा पेच निर्माण झाला होता. अखेर सर्प मित्रांनी रेस्क्यू ऑपरेशन करत आधी नागाला मग मृत शेतकऱ्याचा मृतदेह बाहेर काढला.
शेतकरी विहिरीत पडला अन् मृतदेहावर फणा काढून नाग बसला, अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO pic.twitter.com/9RiMEtf60q
— News18Lokmat (@News18lokmat) May 26, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.