सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक जाफर अहमद सय्यद यांनी ठिबक संच विक्रेत्याला हाताशी धरून पंढरपूर व माळशिरस तालुक्यांतील अनेक शेतकऱ्यांच्या नावे ठिबक संच खरेदीची बोगस कर्ज प्रकरणे करून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसा आल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे तरी संबंधितावर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे असे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी सांगितले.