पंढरपूर, 7 मे : महाराष्ट्रामध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असून संजय राऊत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते नितेश राणे यांनी केला. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी म्हणजेच 10 जूनला संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असं नितेश राणे म्हणाले.
संजय राऊत यांच्या शरद पवारांसोबत अनेक बैठका झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता राहिला नसल्यानं संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत यांची भूमिका पहा ते कायम अजित पवारांवर टीका करत आले आहेत. संजय राऊत यांची अशी अट आहे की, ज्या दिवशी अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडतील त्यादिवशी ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं राणे यांनी म्हटलं आहे.
राजीनामास्त्रानंतर पवार पहिल्यांदाच विठ्ठलाच्या चरणी, पंढरपुरातून पुनश्च हरी ओम!
पवारांचा टोला
नितेश राणे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सिरियस बोलण्यासंबंधीचा ज्यांचा लौकिक आहे, त्याचं उत्तर मी देईन. या पोरासोरांच्या वक्तव्यावर मी काय बोलणार? अशी खिल्ली शरद पवारांनी उडवली.
पंढरपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांनी काहीच दिवसांपूर्वी मी पुन्हा येईन बाबत वक्तव्य केलं होतं, त्यावरही पवारांनी टोला लगावला. आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येईल, हे मी सांगू शकत नाही. देवेंद्र फडणवीस जर पुन्हा येईन म्हणतात तर त्यांना निकाल बाबत माहिती असेल, असा निशाणा शरद पवारांनी साधला.
भाजप प्रवेशाच्या चर्चा, पण पवारांनी भाकरी फिरवली, राष्ट्रवादीने विधानसभा उमेदवार ठरवला!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.