बगोदर, 15 एप्रिल : पत्नीचे एका दुसऱ्या पुरुषाशी विवाहबाह्य संबंध असल्याचा पतीला संशय होता. त्यामुळे पती चांगलाच संतापला होता. यानंतर रागाच्या भरात पतीने घरात ठेवलेल्या धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरून निर्घृण खून केला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. सुनिता देवी असे मृत महिलेचे नाव आहे. तर फूलचंद मांझी असे आरोपीचे नाव आहे.
या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी बगोदर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना दिली. हत्येची माहिती मिळताच बगोदर पोलिसांनी देवराडीह पंचायतीच्या केंजिया गावात पोहोचून मृत महिला सुनीता देवीचा रक्ताने माखलेला मृतदेह ताब्यात घेतला. तसेच पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनास्थळाजवळून रक्ताने माखलेली कुऱ्हाडही जप्त केली आहे. घटनास्थळावरून आरोपीने पळ काढला. पण नंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
आरोपी काय म्हणाला –
आरोपी फुलचंद मांझी याने पोलिसांसमोर पत्नीच्या हत्येचा गुन्हा कबूल केला आहे. आरोपी पती फूलचंद मांझी याने पोलिसांना सांगितले की, पत्नीचे त्याच्या अनुपस्थितीत अनोळखी व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. याची त्याला जाणीव होती, त्यानंतर रागाच्या भरात त्याने हे हत्या केली. गुन्हा कबूल केल्यानंतर बगोदर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली.
जिया गावातील रहिवासी असलेल्या फुलचंद मांझी याने पत्नी सुनीता देवी हिच्यावर इतर पुरुषांशी अवैध संबंध असल्याचा आरोप करून प्रथम तिला बेदम मारहाण केली, त्यानंतर घरात ठेवलेल्या धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून तिची हत्या केली. आरोपी पती फुलचंद मांझीची मानसिक स्थिती ठीक नाही, त्यामुळेच त्याने एवढं मोठं पाऊल उचललं असल्याचं स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांकडून सांगण्यात आलं. मृत महिला सुनीता देवी आणि आरोपी फूलचंद मांझी यांना एक 6 वर्षांचा मुलगा आहे. जो आता अनाथ झाला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.