मुंबई, 24 एप्रिल : क्रिकेट जगतात गॉड ऑफ क्रिकेट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकर हा आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करीत आहे. यानिमित्ताने भारताबाहेरील सचिनचे सर्वात आवडते क्रिकेट ग्राउंड असलेल्या सिडनी क्रिकेट ग्राउंडकडून सचिनला त्याच्या 50 व्या वाढदिवशी एक खास गिफ्ट मिळालं आहे.
सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळलेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये 157 च्या अॅव्हरेजने 785 धावा केल्या होत्या. त्यात नाबाद 241 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. तेव्हा सचिनच्या 50 व्या वाढदिवसानिमित्ताने ऑस्ट्रेलियातील या क्रिकेट ग्राउंडच्या एका गेटला सचिन तेंडुलकर चे नाव देण्यात आले आहे.
SCG ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले, “1991-92 च्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून सचिनच्या अनेक खास आठवणी SCG शी जोडल्या गेल्या आहेत. तसेच ब्रायन लाराच्या 277 धावांच्या खेळीला देखील यंदा 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने ग्राऊंडवरील एका गेटला सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांचे नाव देण्यात आले. या गेटचे अनावरण एससीजीचे अध्यक्ष रॉड मॅकगिओच आणि सीईओ केरी माथेर आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.
Two legends of the game, now part of this ground forever 🏏
We have today unveiled the Lara-Tendulkar gates, where all visiting cricketers will take to the field when playing at the SCG. pic.twitter.com/cqYEZQ0Pp9
— Sydney Cricket Ground (@scg) April 24, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.