रत्नागिरी, 25 एप्रिल : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी काल गोव्यात होता. दरम्यान, वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सिंधुदूर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनारी आपल्या मित्र परिवारासोबत तो दाखल झाला होता. यावेळी समुद्र किनाऱ्याचा आनंद लुटताना सचिन तेंडुलकरने क्रिकेट खेळण्याचा देखील आनंद लुटला. भोगवे येथील समुद्र किनाऱ्यावर मित्रांसमवेत क्रिकेट खेळतानाचा सचिनचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. यात सचिनने त्याच्या खास शैलीत फटकेबाजी केली.
सचिनने त्याचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांना भेट देत साजरा केला. परुळे भोगवे इथल्या हॉटेलमध्ये त्यानं मुक्काम केला. तसंच किल्ले निवती भोगवे सागर किनारी त्याने संध्याकाळी फेरफटका मारला. क्रिकेटच्या देवाची भेट झाल्यानं किनाऱ्यावर चाहत्यांनाही आनंद झाला. सचिनने सर्वांसोबत फोटोही काढले.
सचिन तेंडुलकरने समुद्र किनाऱ्यावर लुटला क्रिकेटचा आनंद, व्हिडीओ व्हायरल#SachinTendulkar #HappyBirthdaySachin #Cricket #ViralVideo pic.twitter.com/7LUomsptH6
— News18Lokmat (@News18lokmat) April 25, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.