मुंबई, 4 मे : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीर यांच्यात मॅचनंतर झालेल्या वादाचं प्रकरण ताज असताना आता सचिन तेंडुलकर आणि जॉन्टी रोड्स यांच्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे. 3 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईने विजय मिळवला. या विजयानंतर संघ एकमेकांशी हस्तांदोलन करत असतानाचा जॉन्टी रोड्सने केलेल्या कृतीमुळे चाहत्यांचे मन जिंकले आहे.
आयपीएल 2023 मधील 46 वा सामना मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर पारपडला. या रोमांचक सामन्यात मुंबईने 6 विकेट्सने विजय मिळवून सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत असताना पंजाब किंग्सचा प्रशिक्षक जॉन्टी रोड्स आणि मुंबई संघाचा मेंटॉर सचिन तेंडुलकर एकमेकांसमोर आले. यावेळी जॉन्टी रोड्सने सचिनशी हात मिळवण्या ऐवजी त्याचे पाय धरले. जॉन्टीची ही कृती पाहून सचिन भारावला आणि त्याने जॉन्टीला मिठी मारली. जॉन्टी रोड्स हा दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेट असून त्याने केलेल्या या कृतीने भारतीयांचे मन जिंकले.
Dont allow success to breed arrogance in you. If you remain humble, people will give you love & respect even after u have finished with the game.
I wouldbe happier hearing, ‘Sachin is good human being’ than “Sachin is great cricketer.’ -SRT’s Father to him pic.twitter.com/yuH78p8f4A
— CrickeTendulkar 🇮🇳 (@CrickeTendulkar) May 4, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.