मुंबई, 25 एप्रिल- बॉलिवूड अभिनेत्री क्रिसन परेराला UAE(संयुक्त अरब अमिरात) मध्ये ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी काही दिवसापूर्वी अटक करण्यात आली होती. तिची याप्रकरणी शारजाह सेंट्रल तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. आता याप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हे दोन आरोपी परदेशात ड्रग्जची तस्करी करण्यासाठी लोकांचा वापर करत त्यांची फसवणूक करत असल्याचे समोर आलं आहे.
मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेले आरोपी, सगळ्यात पहिल्यांदा लोकांना परदेशात वेबसिरीज बनवत असल्याचे अश्वासन देते होते. यानंतर एकाद्या वस्तूमध्ये ड्रग्ज लपवून त्या व्यक्तीची मुंबईतून परदेशात पाठवनूक करत असे.
वाचा-धक्कादायक! राहत्या घरी आढळला साऊथ अभिनेत्याचा मृतदेह,एक वर्षांपूर्वी झालेलं लग्न
यानंतर आरोपी विदेशी ड्रग्स एजन्सीला याबद्दल माहिती देत असत. यानंतर परदेशात या व्यक्तींना अटक केली जात असे. मग पीडित लोक ड्रग्ज तस्करी प्रकरणात अडकले जायचे आणि त्यांची रवानगी तुरुंगात होत असे.
याच ट्रॉफीत मिळालेल्या ड्रग्ज प्रकरणात क्रिसनला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या मते, आरोपी प्रॉपर्टीच्या लालसेपोटी किंवा पूर्व वैमनस्यातून याप्रकरणी लोकांना फसवत असावेत. आता पर्यंत याप्रकरणात 4 लोकांना असं फसवलं असल्याचं समोर आलं आहे. क्रिसनला एक ट्रॉफी देत ती ऑडिशनसाठी महत्त्वाची असल्याचं सांगितलं होतं. त्याच ट्रॉफीत मिळालेल्या ड्रग्ज प्रकरणात क्रिसनला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
कोण आहे क्रिसन परेरा?
क्रिसन परेरा ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने सडक २, बाटला हाऊस, थिंकीस्तान यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे. क्रिसन सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिचे इन्स्टाग्रामवर 12 हजारांहून जास्त फॉलोवर्स आहेत. क्रिसन निर्दोष असून तिला या प्रकरणात गोवण्यात आल्याचं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.