मुंबई, 11 मे : आज राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्षाच्या या लढाईत उद्धव ठाकरेंना दिलासा मिळणार की एकनाथ शिंदे यांच्या बाजुने निकाल लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्तासंघर्षाच्या निकालाला काही तास शिल्लक असतानाच भाजपचे आमदार प्रवीण दरेकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर दरेकर प्रथमच राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर भेट महत्त्वाची
प्रणीण दरेकर हे राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरेंसोबतची दरेकरांची ही भेट अनैपचारिक असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आज सत्तासंघर्षाचा निकाल हाती येणार आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या भेटीकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
शिंदे, ठाकरेंची वाढती जवळीक
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढत आहे. एकनाथ शिंदे यांनी दोनदा राज ठाकरे यांची भेट घेतली. तर त्यानंतर एकदा राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. महापालिकेसाठी शिंदे गट आणि मनसेची युती होणार असल्याच्या देखील चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर दरेकर यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.