पुणे, 15 मे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अशोक टेकवडे कमळ हाती घेणार आहेत. अशोक टेकवडे हे 2004 ते 2009 दरम्यान पुरंदर हवेलीचे आमदार होते. भाजपकडून राष्ट्रवादीला रोखण्यासाठी मिशन बारामती आखण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर टेकवडेंचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश
अशोक टेकवडे हे मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसण्यात आली आहे. राष्ट्रवादीला त्यांच्याच बाल्लेकिल्ल्यात मात देण्यासाठी भाजपकडून मिशन बारामती आखण्यात आलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर टेकवडे यांचा भाजप प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. टेकवडे याचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
दरम्यान आगामी लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकांपूर्वी भाजपकडून तरुण मतदारांना साद घातली जात असल्याचं पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या तरुणांसाठी भाजपच्या वतीनं युवा संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 18 मे रोजी भाजपकडून युवा संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. युवा संवादमधून युवकांना करिअरबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.