मुंबई, 18 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये 25 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात खेळावला जात आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची विकेट घेण्यासाठी सनरायजर्सच्या कर्णधाराने सुपरमॅन स्टाईल झेप घेतली. या सुपर कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हैद्राबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात सामना सुरु असून या सामन्यात प्रथम फलंदाजी करून मुंबई इंडियन्सने 20 ओव्हरमध्ये ५ विकेट्स घालवून 192 धावा केल्या आहेत. या सामन्यात मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने 28, ईशान किशनने 38, कॅमेरून ग्रीनने 64, सूर्यकुमार यादवने 7, तिलक वर्माने 37 आणि टीम डेव्हिडने 16 धावा केल्या. तर हैद्राबादकडून मॅक्रो जॅनसेनने 2 तर भुवनेश्वर आणि नटराजनने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.
Did You Watch – Two stupendous catches by the #SRH Skipper @AidzMarkram ends Ishan Kishan and Suryakumar Yadav’s stay out there in the middle.#SRHvMI pic.twitter.com/a1sGNjV6r1
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.