अहमदनगर, 16 मे : जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी आज निवडणूक होणार आहे. या निमित्तानं भाजप नेते राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार हे आमने-सामने येणार आहेत. राम शिंदे आणि रोहित पवार यांनी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पूर्ण शक्ती पणाला लावल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणुकीत आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या पॅनलचे प्रत्येकी 9-9 सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे आता सभापतीपदाची निवडणूक ही अत्यंत अटीतटीची होण्याची शक्यता आहे.
विखे पाटील ठरणार गेमचेंजर
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या पॅनलचे प्रत्येकी 9-9 सदस्य निवडून आले आहेत. मात्र त्यातील दोन सदस्य कैलास वराट आणि अंकुश ढवळे हे विखे समर्थक आहेत. ते विखे यांचे कार्यकर्ते असल्यानं आजच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत विखेंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
तुमच्या शहरातून (अहमदनगर)
निवडणुकीमध्ये चूरस
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमदार रोहित पवार आणि राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागल्यानं या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. निवडणुकीत कोणाचं पॅनल बाजी मारणार याकडे सर्वाचं लक्ष होतं. मात्र या निवडणुकीत दोघांनाही सारखच यश आलं. दोन्ही गटाचे प्रत्येकी 9 सदस्य निवडून आले. मात्र रोहित पवार यांच्या पॅनलमधील दोन सदस्य हे विखे समर्थक असल्यानं या निवडणुकीत विखे पाटलांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.