देसुर, 5 मे : कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय नेतेही आपापल्या पक्षाच्या प्रचारासाठी जोर लावून उतरले आहेत. मात्र, त्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. काल (4 मे) बेळगावात प्रचारासाठी गेलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि सतेज पाटील यांना महाराष्ट्र एकीकरण समितीने काळे झेंडे दाखवून विरोध केला होता. तर आज काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची सभा उधळूण देण्यात आली.
महाराष्ट्रातील राजकीय नेते मराठी भाषिक प्रदेशात आपापल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी जात आहे. मात्र, या नेत्यांविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. देसुरमध्ये आज काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शिंदे यांच्या सभा स्थळी घोषणाबाजी करत सभा उधळूण लावण्यात आली. ग्रामस्थांचा विरोध पाहून सभा न घेताच प्रणिती शिंदे यांना माघारी परतावं लागलं.
Video : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची सभा उधळली#PranitiShinde pic.twitter.com/Oful3vhh3V
— News18Lokmat (@News18lokmat) May 5, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.