मुंबई, 21 मे : आज शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. बैठकीदरम्यान राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांची फिरकी देखील घेतली. मतदानाच्या वेळी तुम्ही दुसरीकडे मत देतात आणि समस्या सोडवण्यासाठी माझ्याकडे येतात. जे तुमची पिळवणूक करतात त्यांनाच तुम्ही पुन्हा निवडून देता, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
आपल्या विविध मागण्यांसाठी आज शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांनी आपल्या समस्या राज ठाकरे यांना सांगितल्या. राज ठाकरे यांनी त्या समस्या ऐकून घेत लवकरच त्या दूर करण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं. मात्र यावेळी राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांची फिरकी देखील घेतली. मतदानाच्या वेळी तुम्ही दुसरीकडे मत देतात आणि समस्या सोडवण्यासाठी माझ्याकडे येतात. जे तुमची पिळवणूक करतात त्यांनाच तुम्ही पुन्हा निवडून देता असं राज ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांना म्हटलं आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी देखील आता पुन्हा असं होणार नसल्याचं राज ठाकरे यांना सांगितलं.
तुमच्या शहरातून (मुंबई)
यापूर्वीही बैठक
दरम्यान यापूर्वी देखील राज ठाकरे आणि शेतकऱ्यांची एक बैठक झाली आहे. त्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी राज ठाकरे यांच्यासोबत शेतकरी देखील उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.