धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 3 मे : सध्या सोशल मीडियावर माइंड रिडिंगचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ पाहून तुम्हाला एखाद्या व्यक्तीला भेटून एकदा तरी असं वाटलं असेलच की यांच्या मनात काय चाललंय? जेव्हा असा विचार येतो तेव्हा असं वाटतं की एखादी तरी अशी जादू असावी ज्याचा उपयोग करून दुसऱ्याच्या मनातलं जाणून घेता यावं. दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे जाणून घेणं कोणाला आवडणार नाही? आणि तेव्हाच तुम्हाला समजलं की तशी एक जादू खरंच अस्तित्वात आहे. माइंड रिडिंगमुळे काही गोष्टी ओळखल्या जाऊ शकतात, असं सांगितलं जातं. त्यामुळे ही माइंड रिडिंग काय आहे? पाहुयात.
मुंबईतील गोरेगाव येथे राहणारा विनय कापरी हा तरुण माइंड रिडिंग ही कला करतो. विनय हा एका बँकेत काम करतो मात्र लहान पणापासून आवड असल्यामुळे या कलेबद्दल त्याने प्रशिक्षण घेतलं. 10 ते 15 वर्षांपासून हे करत असून प्रामुख्याने गेल्या 2 वर्षात या कलेकडे त्याने जास्त भर दिला आहे. माइंड रिडिंग मध्ये बरेच प्रकार असतात. यामध्ये लोकांच्या मनात असलेला अभिनेता, एखादा नंबर, त्याचा पिन, एखादी घटना, वायफाय वरील नाव अश्या प्रकारे विविध प्रकार असतात. हे सर्व मनोरंजनासाठी असून दरवेळी यामध्ये आमच्या सारखे मॅजिशियन नवनवीन प्रयोग आणत असतात, असं विनय कापरी सांगतो.
तुमच्या शहरातून (मुंबई)
माइंड रिडिंग काय असतं?
एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चाललं हे जाणता येणं म्हणजे माइंड रिडिंग होय. कोणत्याही साधनांशिवाय एखाद्याच्या मनातील ओळखणं याला माइंड रिडिंग म्हणतात. ही जादू वगैरे नसून एक शास्त्र शुद्ध अशी पद्धत आहे. ज्याद्वारे आपण समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय किंवा तो कसा आहे याबाबत एक अंदाज बघू शकतो. पण हे ही एखाद्या जादू पेक्षा कमी नाहीच.
मनातलं कसं ओळखतात?
या क्रियेत व्यक्ती सजग होऊन आणि आपल्या मेंदूला ताण देऊन समोरच्याची फिलिंग समजतो. काही मनोवैज्ञानिक टेक्निकद्वारा दुसऱ्या व्यक्तीच्या मेंदूत काय चाललं? हे ओळखता येतं. मनोवैज्ञानिक त्याला साहनुभूती निकटता असं म्हणतात. समोरच्या व्यक्तिच्या मेंदूत काय चाललं याचा थोडाफार अंदाजा येतो. माइंड रिडिंग विज्ञानावर अवलंबून आहे, असं अनेकांना वाटतं. मात्र, माइंड रिडिंग ही तंतोतंतपणे विज्ञानावर आधारित नाही. प्रत्येकवेळी तुम्ही योग्यच माहिती देऊ शकाल असं नाही. एखाद्यावेळी तुमची माइंड रिडिंग चुकू शकते. कारण माइंड रिडिंग करताना प्रासंगिक गोष्टींवरूनच ती केली जाते.
Mumbai News : बोलक्या बाहुल्यांची कला टिकवण्यासाठी झटणारा कलाकार, पाहा Video
या कलेला मेंटॅलिझम असे संबोधले जाते. माईंड रिडिंग हा एक प्रयत्न आहे, खऱ्या अर्थाने माइंड रीडिंग होऊ शकत नाही. एक कला असून ही मनोरंजनासाठी केली जाते. जादूच्या काही सिद्धांतांना सायकॉलॉजी सोबत एकत्रित मिश्रण करून एक प्रयोग तयार केला जातो आणि तो मनोरंजनासाठी लोकांसमोर सादर केला जातो, असंही विनय कापरी सांगतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.