ठाणे, 18 एप्रिल : ठाण्यातल्या घोडबंदर परिसरातल्या इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीच्या ज्वाळा इमारतीच्या छतापर्यंत जात आहे. ठाण्यातल्या सिनेवंडर मॉल जवळ असलेल्या इमारतीला आग लागली आहे. ओरियन बिझनेस पार्कमध्ये आग लागली असून, याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.
आग रोखण्यासाठी ठाणे आपक्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, पण अजूनही आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाही. आग लागल्यानंतर इमारतीमध्ये स्फोटांचे आवाजही ऐकू येत आहेत. आग लागली असताना या बिझनेस पार्क मध्ये लोकं अडकून पडली होती पण वेळीच त्यांना बाहेर काढण्यात आले.
ठाणे – – घोडबंदर इथं सिनेवंडर मॅालजवळ इमारतीला लागली भीषण आग pic.twitter.com/HbVntB9VGY
— News18Lokmat (@News18lokmat) April 18, 2023
तुमच्या शहरातून (मुंबई)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.