मुंबई, 10 मे : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. येत्या दोन दिवसांत राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय मंत्री रिजीजू यांची भेट घेतली. या भेटीवर संजय राऊत यांच्याकडून सवाल उपस्थित करण्यात आला होता. तसेच त्यांनी राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली होती. यावर पत्रकार परिषद घेऊन नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले नार्वेकर
संजय राऊत यांचा कायद्याचा अभ्यास कमी आहे. त्यांनी रिजीजू आणि माझ्या भेटीचा चुकीचा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला. आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार माझा आहे. जर अध्यक्ष नसेल तर उपाध्यक्षांकडे ती जबाबदारी येते. मात्र इथे पद रिक्त नसल्यानं तो अधिकार अध्यक्षांचाच आहे. कुठलाही निर्णय आला तरी सरकार स्थिर राहणार असल्याचं वक्तव्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
बेजबाबदार वक्तव्य टाळा
पुढे बोलताना ते म्हणाले की जर अध्यक्षांचा निर्णय चुकला तर कोर्टाला हस्तक्षेप करता येतो. त्यामुळे बेजाबदार वक्तव्य टाळावीत. कोर्टाच्या निर्णयाची वाट पहावी. न्यायालयानं काहीही निर्णय दिला तरी सरकार स्थिर राहणार असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. यावर आता महाविकास आघाडीकडून काय प्रतिक्रिया येणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Breaking news : मविआत पुन्हा भूकंप होणार? बावनकुळेंचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंची प्रतिक्रिया
दरम्यान दुसरीकडे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर प्रतिक्रिया देताना विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे. निकालापूर्वी जे सरकार कोसळणार असल्याचा दावा करत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.