सोनीपत, 3 मे : हरियाणातील सोनीपतमधील पुगथला गावात काल रात्री उशिरा पंचायती जमिनीच्या वादातून धक्कादायक घटना घडली. गावातील काही लोकांनी गावाच्या महिला सरपंचाचा पती आणि गावकऱ्यावंर गोळीबार केला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
घटनेची माहिती मिळताच सोनीपत गन्नौर पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी पोहोचले होते. यानंतर त्यांनी याप्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. आज 3 मे रोजी, सोनीपतमधील पुगथळा येथे गावातील पंचायती जमिनीच्या पेरणीचे कंत्राट सोडण्याची प्रक्रिया होणार आहे. तत्पूर्वी, काल धक्कादायक घटना घडली. गावातील काही लोकांना या जमिनीची बोली लावायची होती. परंतु गावातील रहिवासी ऋषिराज नावाचा व्यक्तीही या बोलीत सहभागी व्हायला जात होता.
यानंतर काही ग्रामस्थांनी प्रथम सरपंच पती सोमदत्त यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर ऋषिराज बोळीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या घरावर हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. माहिती मिळताच, सोनीपत गन्नौर पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला.
या संपूर्ण प्रकरणाबाबत महिला सरपंच यांचे पती सोमदत्त यांनी सांगितले की, गावातील सुमारे दीडशे एकर जमीन, जी पंचायती आहे, ती 1 वर्षासाठी करारनामा करायची आहे. याबाबत गावातील हरेंद्र व जितेंद्र त्याच्यावर करार करू नये म्हणून दबाव टाकत होते. यापैकी, फक्त बोली शेड्यूल कास्टमधील व्यक्ती बोलीमध्ये भाग घेऊ शकत होती आणि ऋषी राज यावेळी बोली लावण्यास इच्छुक होते. याचमुळे त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण आहे. गावात सोनीपत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. डीसीपी गौरव राजपुरोहित यांनी सांगितले की, याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.