मुंबई, 25 एप्रिल : सैफ अली खान आणि करीना कपूर हे चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडते सेलिब्रिटी जोडपे आहेत यात शंका नाही. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. जेव्हा त्यांच्या अफेअरची बातमी समोर आली तेव्हा त्यांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. तेव्हा अनेकांनी सैफची पहिली पत्नी आणि त्याच्या दोन मुलांची आई अमृता सिंग यांना कसे वाटले असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर करीना आणि सैफने आपल्या प्रेमाला नाव देण्याचा निर्णय घेतला आणि लग्नगाठ बांधली. पण यांच्या लग्नावर सैफच्या पहिल्या पत्नीची काय प्रतिक्रिया होती, या दोघींचं नातं कस आहे माहितीये का?
सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्यातील नात्याची जगाला कल्पना आहे. सोशल मीडियावर बेबोची सावत्र मुले अर्थात सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांच्यातील नात्याची झलकही लोक अनेकदा पाहतात. पण दोन सावत्र मुलांच्या आईचे म्हणजेच अमृता सिंग आणि करीना कपूर यांचे नाते कसे आहे हे जाणून घेऊया.
अमृता सिंग ही 80 आणि 90 च्या दशकातील हिट अभिनेत्री होती. तिने तिच्या काळात एकापाठोपाठ एक अनेक हिट चित्रपट दिले, पण सैफ अली खानशी लग्नानंतर मात्र ती करिअरपासून दूर झाली. प्रेमाने सुरू झालेल्या सैफ आणि अमृताच्या नात्यात काही वर्षांतच दुरावा आला आणि 2004 मध्ये दोघे वेगळे झाले. लग्न मोडल्यानंतर अमृता पुन्हा प्रेमात पडू शकली नाही, पण 2007 मध्ये करीना आणि सैफच्या अफेअरने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सैफने करीनाला पतौडी कुटुंबाची सून बनवण्याचा निर्णय घेतला आणि दोघांनी 2012 साली लग्न केले. त्या दिवसांत अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये, सैफ आणि करीना यांच्यातील नात्यामुळे अमृता सिंग खूप संतापली होती’ असं सांगण्यात आलं होतं. मात्र, नंतर अमृताने तिच्या एका मुलाखतीत या सर्व गोष्टी नाकारल्या आणि सर्व अफवा असल्याचं सांगितलं.
सैफ आणि करीना कपूरच्या नात्यामुळे तिला कधीच अडचण आली नाही, असे अमृताने सांगितले होते. जर असे असते तर तिने आपल्या माजी पतीच्या लग्नासाठी आपल्या मुलांना कधीही तयार केले नसते. सारा अली खानने आईने तिला वडिलांच्या दुसऱ्या लग्नासाठी तयार केले होते असा खुलासा अनेकदा केला आहे. पण करीना आणि अमृता दोघीही एकमेकांशी बोलत नाहीत हे खरे आहे. दोघेही आजपर्यंत कोणत्याही कार्यक्रमात एकत्र दिसल्या नाहीत. सारा आणि इब्राहिम अनेकदा सैफसोबत स्पॉट केले जातात, परंतु अमृता कधीही सैफ किंवा करिनासोबत त्यांच्या मुलांसोबत दिसली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.