मुंबई, 1 मे : सध्या भारतात आयपीएल 2023 ची धामधूम सुरु असताना दुसरीकडे भारताने बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. बँडमिंटनमधील स्टार जोडी सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांनी आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे.
आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली आहे. रविवारी दुबईत पारपडलेल्या स्पर्धेत या स्टार जोडीने भारताला तब्बल 58 वर्षांनंतर आशिया चॅम्पियन बनवले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामना हा मलेशियाच्या ओंग येव सिन आणि तेओ यी यी यांच्यासोबत झाला होता. सुरुवातीला सामन्यात पिछाडीवर पडल्यानंतर सात्विक आणि चिरागने जोरदार पुनरागमन करून मलेशियाच्या स्पर्धक जोडीला 21-16, 17-21, 19-21 अशा फरकाने पराभूत केले.
IT’S A GOLD
The wait of 58 years finally comes to an end as our very own Sat-Chi clinch the historic medal. 2️⃣nd for after 1965, 1️⃣st in MD category
: @badmintonphoto @himantabiswa | @sanjay091968 | @lakhaniarun1 #BAC2023#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/3NQbqwy7al
— BAI Media (@BAI_Media) April 30, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.