नरेश पारीक, प्रतिनिधी
चुरू – पूर्वी केवळ नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना भेटण्यासाठी चाहते धडपडायचे. मात्र आता सोशल मीडियावर स्टार झालेल्या कलाकारांची क्रेझही प्रचंड आहे. असाच एक सोशल मीडिया स्टार 25 वर्षीय मुकेश 10 लाखांहून अधिक युट्यूब सबस्क्रायबर्ससह लाखो रुपयांची उलाढाल करतोय. राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील रतननगरात राहणारा मुकेश हा तरुणाईसमोर आदर्श ठरला आहे.
कशी झाली सुरुवात?
मुकेश याने 2016 मध्ये त्याने युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली. त्याने जेव्हा सोशल मीडियावर लोकप्रिय होऊन पैसे कमवण्याचा विचार केला, तेव्हा त्याच्याकडे साधा स्मार्टफोनही नव्हता. मात्र जिद्द भरपूर होती. मित्रांसोबत डान्सचे व्हिडिओ शूट करून मित्रांच्याच मोबाईल किंवा लॅपटॉपवर एडिट करून तो पोस्ट करू लागला. परंतु या व्हिडिओंना हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मग त्याने कॉमेडी व्हिडिओ बनविण्यास सुरुवात केली, परंतु त्यांनाही थंड प्रतिसाद मिळाला. शेवटी मित्रांनीही त्याची साथ सोडली पण मुकेशने हार नाही मानली.
त्याने उधार मोबाईल आणून कुटुंबीयांसोबत, नातेवाईकांसोबत व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली. हळूहळू लोकांना त्याची कला आवडू लागली. त्याने डान्स केला तर डान्स, ऍक्ट केला तर ऍक्ट, एकूणच लोक त्याला पाहण्यासाठी उत्सुक झाले. पाहता पाहता मुकेशची युट्यूब फॅमिली लाखोंच्या घरात पोहोचली. आजच्या घडीला त्याच्या एमके स्टुडिओ युट्यूब चॅनेलचे 10 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. ज्यावर तो डान्स आणि भावनिक व्हिडिओ पोस्ट करतो. विशेष म्हणजे मुकेशचे याशिवाय एमके स्टुडिओ ऑफिशिअल, एमके स्टुडिओ ब्लॉक असे अनेक चॅनेल आहेत.
ना भाड्याचं टेन्शन, ना डिपॉझिट; तरुणाने केला असा जुगाड की नॅनो कारमध्येच थाटलं दुकानं!
हातात स्मार्टफोन नसणाऱ्या मुकेशने आज त्याच्या कलेच्या आणि सोशल मीडियाच्या जोरावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पेलली आहे. त्याच्याकडून सोशल मीडियाचा कामासाठी वापर करावा आणि आपली कला प्रामाणिकपणे जपावी अशी प्रेरणा घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.