दिल्ली, 7 एप्रिल: गेल्या वर्षी कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्याप्रमाणात घट झाल्यानं प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशातून चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे आरोग्य यंत्रणेचं टेन्शन वाढ असून, हालचालींना वेग आला आहे. वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाकडून बैठक बोलावण्यात आली आहे.
24 तासांमध्ये 5 हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद
आरोग्यमंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत देभरात एकूण 5 हजार 335 रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा मागील 24 तासांच्या तुलनेत 20 टक्क्यांनी अधिक आहे. तर गेल्या सहा महिन्यांमधील कोरोना रुग्णांचा हा उच्चांक आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडा देखील मोठा आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आता सक्रिय रुग्णांची संख्या 25 हजार 587 वर पोहोचली आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
आरोग्य मंत्रालय सतर्क
वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये ते राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. या बैठकीमध्ये प्रत्येक राज्यातील आरोग्य विभागातील महत्त्वाचे अधिकारी तसेच नीति आयोगाचे अधिकारीही सहभागी होणार आहेत.
मास्क सक्ती होणार?
कोरोनाला आळा घालण्यासाठी मास्क हे प्रभावी साधन आहे. मास्कमुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होते. देशभरात वाढत असेलेले कोरोना रुग्ण पहाता पुन्हा एकदा देशात मास्क सक्तीची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.