नंद किशोर मंडल, प्रतिनिधी
पाकुड, 25 एप्रिल : रस्त्यावर जर तुमचे पैसे खाली पडले आणि दुसऱ्या क्षणाला कुणी जर पैसे घेऊन फरार होत असेल तर ? अशीच एक घटना झारखंडमधील पाकुडमध्ये घडली आहे. पण हा प्रकार सायबर क्राईमशी निगडीत आहे. मोबाईल क्रमांक तोच असल्यामुळे एका भामट्याने तब्बल 9 लाखांची रक्कम गायब केली आहे. या घटनेमुळे पोलीस सुद्धा हैराण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकुडमधील अनुसार नगरमध्ये राहणारे व्यावसायिक अनिल अग्रवाल यांच्यासोबत ही घटना घडली आहे.
त्यांची पत्नीकडे एक मोबाईल क्रमांक होता. तो फोन क्रमांक काही दिवसांनी बंद झाला. आता सहा महिने हा क्रमांक न वापरल्यामुळे फोन क्रमांक दुसऱ्या एका व्यक्तीकडे गेला. त्यामुळे अनिल अग्रवाल यांची पत्नीच्या जुना मोबाईल क्रमांक एका बँकेशी जोडलेला होता. त्या बँकेतील सर्व व्यवहारांची माहिती आणि ओटीपी हे जुन्या नंबरवर जात होते.
याच संधीचा फायदा घेऊन या भामट्याने अनिल अग्रवाल यांच्या पत्नीच्या जुन्या मोबाईलवर आलेले एसएमएस आणि ओटीपी वापरून तब्बल 9 लाख गायब केले.
एक दिवस जेव्हा अनिल अग्रवाल यांनी बँकेतील खातं चेक केलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी लगेच पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलीस अधिकारी मनोज कुमार आणि त्यांच्या टीमने तपास सुरू केला. तेव्हा लक्षात आलं की, त्यांच्या पत्नीचा जुना फोन नंबर हा गिरिडीह येथील एका व्यक्तीला देण्यात आला आहे. गिरिडीह येथील एका पेट्रोल पंपाच्या खात्यात 1 लाख रुपये जमा झाले आहे. जे अनिल अग्रवाल यांच्या पत्नीच्या खात्यातून ट्रान्सफर झाले आहे. त्याचबरोबर किसान शॉपच्या खात्यात एक लाख आणि मनीष क्विक पेट्रोलियम पंपाच्या खात्यात एक लाख जमा केले आहे. तर बाकीची रक्कम ही पटना आणि कोलकाता इथं दोन खात्यांमध्ये आणि फरीदाबाद इथं एका खात्यात पैसे जमा केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.