विनोद राठोड, प्रतिनिधी
मुंबई, 5 एप्रिल : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांची गळाभेट घेत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. सावरकर यांच्या जीवनावर आधारीत ‘मी सावरकर’ कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरू आहे. या कार्यक्रमामध्ये उषा मंगेशकर रणजीत सावरकर, आशिष शेलार यांच्यासह अनेक पाहुणे उपस्थित आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर पुन्हा एकदा तोंडसुख घेतले आहे. सावरकर यांच्या जीवनावर आधारीत वीर अशी लहान मुलांसाठी 3D मालिका सुरू करण्यात येणार आहे. आज त्या वीरचे पोस्टर आणि अनिमेशनचे उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मी गेल्या आठवाभरापासून सावरकर यात्रा काढत आहे. सावरकर यांचा त्याग आणि प्रखर देशभक्ती कोणीच तुलना करू शकत नाही. आपण किती गौरव यात्रा काढल्या तरी कमीच आहे. हिंदुत्वाचा सुंगध लाभला आहे. सावरकर हे महाराष्ट्राचे दैवत नाही तर महाराष्ट्राचे दैवत होते. सावरकर म्हणजे तलवार आहे. 36 लाखात सावरकर ब्रिटिशना डेंजर वाटत होते.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंरही आजही काही लोकांना सावरकर डेंजर वाटत आहेत. जाणून बुजून काही लोक हिंदुत्व विचारला तडा देण्याचा काम करत आहे. राहुल गांधी सावरकर यांचा अपमान केल्यापासून आम्ही ठरवलं की सावरकर गौरव यात्रा काढली.
वाचा – Thane MVA Morcha : आदित्य ठाकरेंनी केली मुख्यमंत्री शिंदेंची नक्कल, लोक म्हणाले वन्स मोर…
राहुल गांधी यांना स्वतंत्र्यवीर बोलण्याचा अधिकार नाही. राहुल गांधी यांची पॉइंट एक टक्का त्याग करण्याची पात्रता नाही.
राहुल गांधी यांच्या आज्जी इंदिरा गांधी यांनी सावरकवर वर भारत माता असा गौरव केला, पोस्टर काढले. आज्जीचा विचार काय असा प्रश्न आहे. सावरकर यांना बदनाम करण्याचा षडयंत्र केलं आहे.
हिंदुत्वाची अलर्जी असणारे लोकं मुद्दाम अपमानजनक बोलतात. सावरकर यांचा अपमन केला त्यावेळी बाळासाहेब यांनी खुद्द अय्यर यांच्या प्रतिमेला जोडे मारले, आता काय. आज त्यांच्यासोबत जोडो यात्रा काढून गळाभेट करत आहे. हिंदू हृदय सम्राट मानायला काही लोकांची जीभ कतरती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.