Chandrapur : सावली (Savli) शहरातील वॉर्ड क्र.१७, सावली तुकूम/ तीन कवाडी येथील रोशन दशरथ कत्तुरवार (वय २८ वर्षे) हा युवक घरातील कमवता व्यक्ती आहे. घरची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे. त्यामुळे मिळेल ते काम करून रोशन घरखर्च चालवत असे. पण ६ महिन्यापुर्वी धान चुरणी सुरु असताना रोशन कत्तुरवार याचा पाय थ्रेशर मशीन मध्ये अडकून तुटला. कमावत्या व्यक्तीवर दुःखाचे संकट कोसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. या घटनेमुळे सावली शहरात हळहळ सुरु झाली. तेव्हा सावली तालुका काँग्रेस (Congress) कमिटीच्या माध्यमातून आ. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी रोशन दशरथ कत्तुरवार यास पुढील उपचारासाठी व छोटा-मोठा धंदा करून उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक मदत पाठवली.
सदर मदत सावली न.प. च्या नगराध्यक्षा लता लाकडे यांनी रोशन कत्तुरवार यांना प्रदान केली. यावेळी कत्तुरवार कुटुंबियांनी आ. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचे मनापासून आभार व्यक्त करताना कुटुंबियांचे अश्रू अनावर आले होते. यावेळी नगरसेवक व काँग्रेस सावली शहराध्यक्ष विजय मुत्यालवार, नगरसेवक प्रफुल वाळके, सचिन सांगिडवार, नगरसेविका साधना वाढई, वॉर्ड क्र.१७ च्या नगरसेविका अंजली देवगडे, पल्लवी ताटकोंडावार, ज्योती गेडाम व सोशल मीडिया तालुकाध्यक्ष कमलेश गेडामसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.