मुंबई, 12 मे : बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांचं अफेअर सर्वश्रृत आहे. दोघांच्या अफेअरचे अनेक किस्से आहेत. दोघेही कोणत्याही कार्यक्रमाला एकत्र आले तर त्याची चर्चा नक्कीच होते. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे नेहमीच रेखापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का की रेखा आणि अमिताभ यांचं नातं जरी संपुष्टात आलं असलं तरी रेखा आणि ऐश्वर्याचं नातं मात्र फार खास आहे. दोघी कधीही भेटल्या तरी एकमेकांना मिठी मारल्या शिवाय पुढे जात नाहीत. रेखाचं ऐश्वर्यावर विशेष प्रेम आहे.
अमिताभ आणि रेखा यांची केमिस्ट्री अनेक वर्षांपासून बिघडली आहे. मात्र बिग बींची सून ऐश्वर्या आणि रेखा यांची केमिस्ट्री आता चांगलीच रंगलीये. ऐश्वर्या आणि रेखा यांच्यात नेमकं काय नात आहे? पाहूयात. रेखा यांनी ऐश्वर्यावर असलेलं प्रेम जाहीरपणे व्यक्त केलं आहे. थेट पत्र लिहून त्यांनी बिग बींच्या सुनेचं कौतुक केलं होतं.
हेही वाचा – प्रियांका ते अजय देवगन; ‘या’ 5 कलाकारांनी ऐतिहासिक सिनेमात ओतला जीव, हिट झाल्या भूमिका
ऐश्वर्या आणि रेखा यांच्यात मजबूत बॉन्डीग आहे. फेमिना मॅगझीनमध्ये 2018मध्ये रेखानी ऐश्वर्यासाठी एक लेटर लिहिलं होतं. तिच्या व्यक्तिमत्त्वापासून तिच्या दिसण्यापर्यंत सगळ्याचं गोष्टींचं तोंडभरून त्यात कौतुक करण्यात आलं होतं. रेखा यांनी लिहिलं होतं की, “मेरी ऐश, तुझ्यासारख्या महिला या वाहणाऱ्या नदी सारख्या असतात. ज्या कधीच थांबत नाहीत. त्यांना जिथे जायचं आहे तिथेच त्या जातात आणि आपलं ध्येय साध्य करतात. हिंमत हा एक गुण आहे. हिम्मतीशिवाय तुम्ही कोणतीच गोष्ट करू शकत नाहीत याचं तू एक जिवंत उदाहरण आहे. तुझी ताकद आणि प्युअर एनर्जी तू काही बोलण्याआधीच तुझा परिचय करून देते”.
रेखा यांनी पत्रात पुढे लिहिलं होतं की, “तुला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या तू फॉलो केल्या आणि लोक तुझ्यावरची नजर हटवू शकले नाहीत. तू खूप पुढे जा. आणखी मोठा प्रवास तुला करायचा आहे. अनेक संकटांचा तू सामना केला आहेत. तुझा मला किती अभिमान वाटतोय हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही”.
“तुझ्यावर सोपवलेल्या सगळ्या भूमिकेत तू सर्वोत्तम देतेस. पण माझ्यासाठी तुझी सर्वात आवडती व्यक्तिरेखा आराध्याच्या आईची आहे. तिच्यावर तुझं प्रेम आणि जादू अशीच देत राहा. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला खूप आशिर्वाद. तुझी रेखा मां”, अस त्या शेवटी म्हणाल्या.
रेखा यांनी ऐश्वर्यासाठी लिहिलेल्या या पत्राची खूप चर्चा झाली होती. अमिताभ आणि रेखाच्या अफेअर्सच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला होता. असं म्हटलं जातं की तेव्हा जया बच्चन यांना आपल्या सुनेवर रेखानं व्यक्त केलेलं प्रेम अजिबात आवडलं नव्हतं. दरम्यान रेखा आणि ऐश्वर्या नुकत्याच NMAC च्या उद्धाटनाला एकत्र आल्या होत्या. तेव्हा देखील त्यांच्यातील बॉन्डिंग पाहायला मिळालं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.