नितिन गोस्वामी, प्रतिनिधी
चंदौली, 6 मे : नव्या संसाराची मंडपात राखरांगोळी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नवरदेवाने लग्नात तमाशा केल्यानं लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला होता. उत्तर प्रदेशातील चांदौली जिल्ह्यातील नौगढ भागात गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.
सिंदूर दानाच्या आधी नशेच्या अवस्थेत वराने असे कृत्य केले की, संपूर्ण प्रकरण चिघळले. यामुळे संतापलेल्या वधूने लग्नास नकार दिला. त्यानंतर मुलीच्या बाजूच्या लोकांनी संपूर्ण मिरवणूक ओलीस ठेवली. प्रदीर्घ बाचाबाचीनंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात आणून तोडगा काढला, त्यानंतरच मिरवणूक त्यांच्या घरी जाऊ शकली. मिर्झापूर जिल्ह्यातील अहिरौरा पोलीस स्टेशन हद्दीतील माणिकपूर गावातून वरात गुरुवारी संध्याकाळी चकरघट्टा पोलीस स्टेशन हद्दीतील तेंदुआ गावात आली होती.
गावातील लोकांनी वऱ्हाडींचे मनापासून स्वागत केले आणि लग्नापूर्वीचे सर्व विधी पार पाडले. यादरम्यान सिंदूर दान करण्याची संधी आल्यावर नशेच्या अवस्थेत वराला सिंदूर लावता आला नाही. मुलीची मागणी पूर्ण करण्याऐवजी त्याने तिच्या चेहऱ्यावर सिंदूर लावला. गदारोळ होताच तो बहाणा करून मंडपातून पळून गेला. तर वऱ्हाड्यांना जेवण दिल्यानंतर वर आणि इतर नातेवाईक लग्न समारंभासाठी लग्नमंडपात पोहोचल्याचे सांगितले जात आहे. काही वेळात वधूही तेथे पोहोचली. काही विधी झाल्यावर जेव्हा पंडितांनी सिंदूर दान करण्याचा विधी सांगितला. त्यावेळी मद्यधुंद वराला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि त्याने वधूच्या चेहऱ्यावर सिंदूर लावायला सुरुवात केली. वधूने त्याला थांबवल्यावर त्याने तिच्यावर हातही उगारला.
हे सर्व पाहून इतरांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण दुसरीकडे वधूने लग्नास नकार दिला. वधू मंडपातून घरात गेली. त्यावरून गदारोळ झाला. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून बहुतांश वऱ्हाडींची पळापळ झाली. मुलीच्या नातेवाईकांसह स्थानिक ग्रामस्थांनी वराला आणि त्याच्या वडिलांना अडवले. त्यांना ओलीस ठेवल्याचीही बातमी आली.
तर 112ला माहिती मिळताच चक्रघट्टा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी गेले. दोन्ही बाजूच्या लोकांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी पोलीस ठाण्यात, दोन्ही पक्षांनी विवाह आयोजित करण्यासाठी खर्च केलेले पैसे परत देण्यावर आणि विवाह बंधन न राखण्यावर सहमती दर्शविली. त्यानंतरच वऱ्हाडी त्यांच्या घरी परतले. या घटनेची परिसरात एक चर्चा होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.