सांगली, 08 एप्रिल : सांगलीच्या कुरळपमध्ये हनुमान यात्रेनिमित्त सिकंदर शेखने आंतरराष्ट्रीय पैलवान असणाऱ्या इराणच्या अली मेहरीला आस्मान दाखवलं. भर पावसात झालेल्या या कुस्ती मैदानात सिकंदर शेखने बाजी मारत चार लाखांचं रोख बक्षीस आणि बुलेट गाडी पटकावली. त्याला हनुमान केसरी किताब देऊनही गौरवण्यात आले.
कुरळमध्ये हनुमान यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते. महिलांच्या कुस्त्याही या मैदानात झाल्या. तर महान भारत केसरी पैलवान सिकंदर शेख आणि इराणचा अली मेहरी यांची प्रमुख कुस्ती झाली. या कुस्तीसाठी विजेत्या पैलवानाला चार लाख रुपये आणि बुलेट गाडी असं बक्षीस होतं.
IPLच्या झगमगाटापासून दूर, इंग्लंडमध्ये घाम गाळतोय पुजारा; काउंटीत झळकावलं शतक
तुमच्या शहरातून (सांगली)
सिकंदर शेख आणि अली मेहरी यांच्या कुस्तीवेळी पावसाने हजेरी लावली. पावसासोबत वीजांचा कडकडाटही सुरु होता. अशा परिस्थितीतही तीन मिनिटे ही कुस्ती झाली. सिकंदर शेखने दुहेरी पट काढत एक चाक डावावर अली मेहरीला चितपट केलं.
भर पावसातही कुस्ती पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी मैदानात हजेरी लावली होती. सिकंदर शेखने इराणच्या मल्लाला पराभूत केल्यानंतर कुस्ती शौकिनांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.