मुंबई, 18 मे- बॉलीवूड स्टार्सची क्रेझ नेहमीच त्यांच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. कधी ते त्यांच्या लूकमुळे तर कधी इतर काही कारणांमुळे नेहमीच बॉलिवूड स्टार्स चर्चेत असतात. चाहत्यांना नेहमीच त्यांच्या आवडत्या कलाकारांविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला आवडते. विशेष करून आपल्या आवडता कलाकार बालपणी कसा दिसायचा याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येक चाहत्याला असते. अशाच आणखी एका बॉलिवूड स्टारचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या फोटोमध्ये हा कलाकार अतिशय क्यूट दिसत आहे. विशेष म्हणजे या चिमुकल्याचे पोझ देखील खूप सुंदर दिली आहे.
फोटोत दिसणाऱ्या या चिमुकल्याचे वडील एकेकाळी बॉलिवूडचे सुपरस्टार होते. सिनेमाचं बाळकडू या चिमुकल्याला घरातूनच मिळालं आहे. वडिलांप्रमाणेच त्यानेही बॉलिवूडमध्ये यशाचा झेंडा फडकावला आहे. इतकंच नाही तर तो आता राजकीय विश्वात देखील सक्रीय आहे. होय, फोटोत दिसणारा मुलगा दुसरा कोणी नसून बॉलिवूडच्या यशस्वी अॅक्शन हिरोंपैकी एक सनी देओल आहे. दाही किलो का हात..म्हणून प्रिसद्ध असलेला सनी देओल बालपणीच्या या फोटोमध्ये अत्यंत क्यूट दिसत आहे.
वाचा-हरियाणवी डान्सर सपना चौधरीचा कान्समध्ये पाहायला मिळणार जलवा
सनी देओलने बॉलिवूडला एकापेक्षा एक उत्तम चित्रपट दिले आहेत. गदर या त्याच्या सिनेमानं संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली होती. सनीचे वडील धर्मेंद्र हे देखील बॉलिवूड सुपरस्टार आहेत आणि त्यांची सावत्र आई हेमा मालिनी देखील त्यांच्या काळातील लेडी सुपरस्टार आहेत. त्याच्या कारकिर्दीत तर सनीने धुमाकूळ घातलाच होता आता पुन्हा एकदा तो गदर २ मधून प्रेक्षकांमध्ये धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. सनी 90 च्या दशकातील सुपरस्टार आणि अॅक्शन हिरो देखील आहे.
सनीने त्याच्या करिअरमध्ये गदर एक प्रेमकथा, बॉर्डर, डर, दामिनी, घायल, घाकत आणि जिद्दी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सनीने बेताब चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि आजही इंडस्ट्रीत त्याच्या नावाचा दबबा पाहयला मिळतो. अभिनयासोबतच सनी देओलने त्याचा भाऊ बॉबी देओल आणि धर्मेंद्र यांच्यासोबत ‘अपने’सारखा सुपरहिट चित्रपटही बनवला होता.
गदर सिनेमामुळे सनीची लोकप्रियता इतकी वाढली की सनी देओलचे सिनेमे रिलीज झाले की पंजाबमधील चित्रपटगृहे सकाळी 6 वाजल्यापासून उघडायची. इतकंच नाही तर 1999 मध्ये अर्जुन पंडितची व्यक्तिरेखा गँगस्टर विकास दुबेला इतकी आवडली होती की त्याने आपलं नाव बदलून विकास पंडित ठेवलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.