मुंबई, 5 मे : ‘लोक माझे सांगाती भाग 2’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी राजीनामा बॉम्ब फोडला. यानंतर फक्त राष्ट्रवादीच नाही तर महाराष्ट्रातलं राजकारणही ढवळून निघालं. अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना तर सभागृहातच अश्रू अनावर झाले. पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सर्वजण करत होते. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपला निर्णय मागे घेतला आहे. दरम्यान, पवारांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर पुढील अध्यक्ष सुप्रिया सुळे होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यावर पवार यांना विचारलं असता त्यांनी एका वाक्यात हा विषय निकाली काढला.
अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा
शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर अनेक दावे केले जात होते. आपल्या मागे अध्यक्ष पदावरून पक्षात उभी फूट पडू द्यायची नसेल तर आत्ताच आपल्या डोळ्यासमोरच मुलगी सुप्रिया सुळे यांना अध्यक्षपद मिळवून दिलं तर काय वाईट. आणि समजा अजित पवार यांना निर्णय मान्य नसेलच तर ते भाजपसोबत जातील. कदाचित म्हणून पवार यांनी हे इमोशनल कार्ड खेळल्याचं बोललं जातं होतं. मात्र, सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याच्या वृत्तांमध्ये तथ्य नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
काय म्हणाले शरद पवार?
2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व नेत्यांना एकत्र आणण्याची भूमिका महत्त्वाची भूमिका आहे. या कामात तुमची आवश्यकता आहे असं मत सर्व नेत्यांनी व्यक्त केलं. राष्ट्रवादीत फूट पडणार असल्याचं सामना वृत्तपत्रात लिहिलं असल्याचं विचारलं असता, ज्यांनी लिहिलं त्यांना विचारावं, अशी कोणतीही माहिती मला नाही, असं पवार म्हणाले. माझी जबाबदारी नेमकी कशी होती, विश्वासात घेणं. मी निर्णय घेताना नेत्यांना विश्वासात घेतलं नाही याची मला खंत आहे. माझ्यासोबत बसलेले सगळे बॅकअपच आहेत, नव्या कुणालातरी संधी मिळावी म्हणून मी प्रयत्नशील होतो. पण त्याला रोखलं. मी सहकाऱ्यांशी चर्चा करेन, उदा. जिल्हा लेव्हलसाठी, राज्यपातळीसाठी नेतृत्त्वाची संधी देण्याता मी प्रयत्न करेन. भाकरी फिरवायला गेलो होते. पण भाकरी थांबली ना? असंही शरद पवार यांनी सांगितले.
वाचा – Sharad pawar : कुणाला जायचं असेल तर…, शरद पवारांचा रोख नेमका कुणाकडे?
पुन्हा अध्यक्षपद स्वीकारतो : पवार
‘लोक माझे सांगाती’ हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनाचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या याचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.