मुंबई, 16 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये आज 22 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पारपडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने आपल्या होम ग्राउंडवर कोलकाताचा पराभव केला आहे. मुंबईने विकेट्स 5 विकेट्स आणि रन्स राखून या सामन्यात विजय मिळवला.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना पारपडला. यासामन्यात सुरुवातीला टॉस जिंकून मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या कोलकाता नाइट रायडर्सची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये केकेआरचा खेळाडू जगदीशनची विकेट पडली. त्यानंतर लागोपाठ केकेआरचे फलंदाज स्वस्तात बाद होत असताना व्यंकटेश अय्यरने मैदानात जम बसवून शतकीय कामगिरी केली.
कोलकाता नाइट रायडर्सकडून व्यंकटेश अय्यरने 104, शार्दूल ठाकूरने 13, रिंकू सिंहने 18, रुसेलने 21 धावांची कामगिरी केली. तर केकेआरच्या इतर फलंदाजांना दोन अंकी धाव संख्या करता आली नाही. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजापैकी रितिक शौकीनने 2 तर कॅमरुन ग्रीन, रिले मेरेडिथ, पियुष चावला, डुआन जॅन्सन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.
IPL 2023 : अर्जुन आणि सचिन तेंडुलकर या बाप लेकाच्या जोडीने आयपीएल मध्ये रचला इतिहास
कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून मुंबई इंडियन्सला विजयासाठी 186 धावांच आव्हान ठेवले. मुंबई इंडियन्सकडून जवळपास सर्व फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. ईशान किशनने होम ग्राउंडवर 25 चेंडूत 58 धावा केल्या यासोबत मागील बऱ्याच सामन्यात खराब प्रदर्शन करणारा सूर्या या सामन्यात पुन्हा त्याच्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. सूर्याने 25 चेंडूत 43 धावा केल्या. तर तिलक वर्माने 30 , टीम डेव्हिडने 24 धावांचे योगदान दिले. मुंबई इंडियन्सने 18 व्या ओव्हरमध्ये विजयासाठी दिलेले आव्हान पूर्ण करून सामना जिंकला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.