मुंबई, 22 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये 31 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाबने मुंबईला पराभवाचा धक्का दिला आहे. होम ग्राउंडवर मुंबई इंडियन्सचा 13 धावांनी पराभव झाला असून पंजाब किंग्सला मुंबईचा विजयी रथ रोखण्यात यश आले आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी मैदानात आलेल्या पंजाब किंग्सच्या संघाकडून मॅथ्यू शॉर्टने 11, प्रभसिमरनने 26, अथर्व तायडे 19, लिविंगस्टोनने 10, हरप्रीत सिंहने 41, सॅम करनने 55 तर जितेश शर्माने 25 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून पीयूष चावला आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर अर्जुन तेंडुलकर, जोफ्रा आर्चर आणि बेहरेनडॉर्फने प्रत्येकी 1 विकेट घेतली. पंजाब किंग्सने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 214 धावा केल्या.
मुंबई इंडियन्सला विजयासाठी 215 धावांचे आव्हान मिळाल्यावर कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशनची जोडी मैदानात फलंदाजीसाठी आली. मात्र अर्शदीपच्या बॉलिंगवर ईशान किशन स्वस्तात बाद झाला. परंतु त्यानंतर मुंबईकडून रोहित शर्माने 44, कॅमेरून ग्रीनने 67, सूर्यकुमार यादवने 57, तर टीम डेव्हिडने 25 धावा केल्या. तर इतर फलंदाजांना दोन अंकी धाव संख्या करता आली नाही. यात पंजाबकडून अर्शदीप सिंहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या तर नाथन एलिस आणि लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी 1 विकेट घेतली. अखेर मुंबईचा संघ विजयचे आव्हान पूर्ण करू न शकल्याने त्यांचा 13 धावांनी पराभव झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.