मुंबई, 02 एप्रिल : रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक नीता अंबानी यांच्या स्वप्नातील आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे सांस्कृतिक केंद्र प्रत्यक्षात साकारलं.नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर म्हणजे एनएमएसीसीचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. गेले दोन दिवस हा सोहळा सुरू होता. ज्याला देशविदेशातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली. तीन दिवसांच्या उद्घाटन सोहळ्याचा आज शेवटचा दिवस होता. सेलिब्रिटींनंतर आता सर्वसामान्यांनाही एंट्री दिली जाणार आहे.
NMACC हे देशातील पहिले सांस्कृतिक केंद्र आहे, जे आंतरराष्ट्रीय सुविधांनी सुसज्ज आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये हे केंद्र आहे. जगभरातील कलात्मक प्रदर्शने येथे भरवली जातील. स्टुडिओ थिएटर, पब्लिक आर्ट आणि आर्ट हाऊससह अनेक गोष्टी या केंद्रात आहेत.
एनएमएसीसीमध्ये गेल्या दोन दिवसांतील नेत्रदीपक परफॉर्मिंग आणि कॉस्च्युम आर्ट शोच्या प्रवासानंतर सेंटरच्या लाँच प्रोग्रामिंग वीकेंडच्या शेवटच्या दिवशी व्हिज्युअल आर्ट्सकडे सर्वजण वळले. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी यांच्या हस्ते आर्ट हाऊस संगमचं उद्घाटन झालं. या आर्ट हाऊसमध्ये 5 भारतीय आणि 5 आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या 50 हून अधिक उत्कृष्ट कलाकृती आहेत. भारताच्या विविध संस्कृती आणि परंपरा या कलाकृतींमध्ये दर्शवल्या गेल्या आहेत. आर्ट हाऊससोबतच नीता अंबानी आणि ईशा अंबानी यांनी ‘इंडिया इन फॅशन: द इम्पॅक्ट ऑफ इंडियन ड्रेस अँड टेक्सटाइल्स ऑन द फॅशनेबल इमॅजिनेशन’ चं अनावरण केलं.<
तुमच्या शहरातून (मुंबई)
भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकार आणि जगभरातील प्रमुख व्यक्तिमत्त्वांचा एकत्रितपणे एकत्र येण्याचा तीन दिवसांचा हा उत्सव आता संपला असला तरी केंद्रात ‘द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन’ सह उत्साह कायम आहे. ‘इंडिया इन फॅशन’ आणि ‘संगम संगम’ हे 3 एप्रिलपासून सर्वसामान्य लोकांसाठी खुलं होणार आहे.
NMACC च्या उद्घाटनाला देशविदेशातील सेलिब्रिटी
31 मार्चला या केंद्राचं उद्घाटन झालं. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी आणि त्यांची मुलगी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) च्या संचालक ईशा अंबानी या समारंभाला उपस्थित होत्या. याशिवाय अनंत अंबानी आणि त्यांची होणारी बायको राधिका मर्चंट यांनीही उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका अंबानी देखील सहभागी झाले होते.
नीता अंबानीचं कल्चरल सेंटर पाहूनच दिपतील डोळे; NMACCचे Inside Photo
देशविदेशातील सेलिब्रिटीही या केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात आले होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह या कार्यक्रमाला पोहोचले होते. त्यांच्या व्यतिरिक्त सलमान खान, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, युवराज सिंग, सोनम कपूर, नीतू कपूर, गौरी खान, उद्योगपती आनंद महिंद्रा, सचिन तेंडुलकर पत्नी आणि मुलीसह आले. हॉलिवूड स्टार टॉम हॉलंडही या कार्यक्रमात पोहोचल्याची माहिती आहे. या सोहळ्याला सुपरस्टार रजनीकांतही उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.