मुंबई, 25 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळत आहे. आरसीबीकडून विराट फलंदाजीत जबरदस्त कामगिरी करीत असून त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील स्टेडियममध्ये येऊन त्याला चिअर करताना दिसते. आयपीएल दरम्यान विरानुष्का लंच डेट वर गेले असताना एक चाहता सेल्फीसाठी अनुष्काच्या जवळ येऊ लागला, हे पाहून विराटच्या रागाचा पारा चढलेला दिसला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बंगळुरूच्या ‘सेंट्रल टिफिन रूम’ या रेस्टॉरंटमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघे लंच डेटवर आले होते. परंतु विराट अनुष्का या हॉटेलमध्ये आहेत याची बातमी लोकांना कळताच त्यांचे चाहते दोघांची एक झलक पाहण्यासाठी रेस्टॉरंट बाहेर जमले. हळूहळू ही गर्दी इतकी वाढली की विराट अनुष्काला रेस्टॉरंटमधून बाहेर पडणे देखील मुश्किल झाले.
.@imVkohli and @AnushkaSharma spotted this legendary #CTR Malleshwaram restaurant..crowd chants #RCB #RCB pic.twitter.com/tPCocgI1en
— A Sharadhaa (@sharadasrinidhi) April 22, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.