भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर सेव्ह आयएनएस विक्रांत या मोहीमेखाली पैसे जमा करून 57 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत आयएनएस विक्रांतच्या पैशांचा अपहार झाला आहे, तसेच या प्रकरणी आरोपी निर्दोष नाहीत, त्यामुळे उगाच वचवच करू नये अशा आक्रमक शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना लक्ष्य केले. भाजप नेते किरीट सोमय्यांना हायकोर्टानं मोठा दिलासा दिला असून. मुंबई उच्च न्यायालयानं किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. तसेच, अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, सोमवार 18 एप्रिलपासून सलग चार दिवस चौकशीला हजेरी लावण्याचे निर्देशही किरीट सोमय्यांना दिले आहेत. दरम्यान, किरीट सोमय्यांनी संयम बाळगावा, आणखी प्रकरणे बाहेर येणार आहेत असे सांगत संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधत भाजप नेते किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे.
आणखी काय म्हणाले राऊत?
विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच अटकेपासून संरक्षण मिळतंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांना जामीन का मिळत नाही? असा सवाल राऊतांनी केला आहे. तसेच न्यायव्यवस्थेत विशिष्ट विचारसरणीचे लोक आहेत असे सांगत राऊतांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.
देशाच्या न्यायव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली आहे, देश पुन्हा फाळणीच्या दिशेनं जातोय अशी भीती वाटतेय. आज बाबासाहेब आंबेडकर असते तर अश्रू ढाळले असते असे यावेळी सोमय्या म्हणाले.रामनवमीच्या दिवशी घडलेल्या दंगली ही निवडणुकांची तयारी सुरू आहे. अशातच निवडणुकांसाठी वातावरण बिघडवण्याचं काम सुरू आहे, दंगलीच्या घटनांवरून राऊतांनी विरोधकांवर नाव न घेता हल्लाबोल केला आहे. अखंड भारताला कोणताही पक्ष विरोध करणार नाही. आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या, आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा, अखंड हिंदुस्थानाची भाषा करणाऱ्यांना राऊतांनी टोला लगावला आहे.
कथित आयएनएस विक्रांत घोटाळ्या प्रकरणी बोलताना ते म्हणाले आहेत की, ”आम्ही दमडीचाही घोटाळा केलेला नाही. 58 कोटींची भाषा संजय राऊत यांनी वापरली होती. हा आठवा आरोप होता आणि आठी आरोपांमध्ये एकही कागदी पुरावा नाही. फक्त स्टंटबाजी करत दोन-पाच दिवस मीडियाचं अटेंशन मिळवायचं. न्यायालयावर मला विश्वास आहे. न्याय मिळायची सुरुवात झाली आहे.”