दिल्ली, 09 मे : महिलांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी किंवा इतरत्र अत्याचाराला सामोरं जावं लागतं. याविरोधात काही महिला आवाज उठवतात पण काही महिला बदनामीच्या भितीने काहीच बोलत नाहीत. पर्यटनाला एकट्या जाणाऱ्या महिलांनाही असा वाईट अनुभव येतो. आता एका स्कूबा ड्रायव्हरने महिलेला पाण्याखाली किस केल्याचा प्रकार समोर आलाय.
मलेशियात पर्यटक मोठ्या प्रमाणावर सुट्ट्यांमध्ये जातात. या देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. मात्र आचा एका चिनी पर्यटकासोबत घडलेल्या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. स्कूबा डायव्हिंग करत असताना ट्रेनरने पाण्याखाली महिलेला गालावर किस केलं. यानंतर महिलेला राग अनावर झाला.
याला म्हणतात नशीब! 6 वर्षांपासून बेघर, आता अचानक झाली 40 कोटीची मालकीण
महिलेनं घडलेल्या प्रकाराबद्दल सांगताना म्हटलं की, पाच मे रोजी हा प्रकार घडला. समुद्रात स्कूबा डायव्हिंग करण्यासाठी गेले होते. स्कूबा डायव्हिंग करायला येत नसेल तर त्यांना सेफ्टीसाठी एक्सपर्टसुद्धा सोबत पाठवला जातो. महिलेसोबत एक इन्स्ट्रक्टर होता. फोटो काढण्याशिवाय इन्स्ट्रक्टर संबंधित व्यक्तिला काही इजा होऊ नये याचीही काळजी घेतात. पण महिलेच्या इन्स्ट्रक्टरने धक्कादायक कृत्य केलं.
महिलेने आरोप केला की, पाण्यातून बाहेर येताच इन्स्ट्रक्टर त्रास देऊ लागला. सतत मेसेजही करत होता. कुठे थांबलेय, कुणीकडे निघालेय याची चौकशी करत होता. तसंच सोबत राहण्यासाठीही विचारत होता. यानंतर घाबरलेल्या महिलेने थेट पोलिस स्टेशन गाठलं. इन्स्ट्रक्टरवर छेडछाड केल्याचा आरोप केला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.