मुंबई, 16 मे : स्टार स्पोर्ट्स इंडिया नेटवर्क सध्या एका व्यक्तीमुळे चांगलंच अडचणीत आलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी या चॅनेलवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. इंडियन प्रीमियर लीग टीव्ही ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने 12 मे रोजी स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकीचा शो प्रसारित केला होता. त्यावर अनेक गट आणि प्रेक्षकांनी आक्षेप घेतला असून, स्टार स्पोर्ट्सविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
2021 मध्ये धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आणि सध्या जामिनावर सुटलेला फारुकी, 12 मे रोजी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल सामान्याच्या स्टार स्पोर्ट्सवरील कव्हेरजमध्ये सहभागी झाला होता. फारुकीच्या उपस्थितीवरून, अनेक ट्विटर युजर्सना चॅनेलने आयपीएल मॅचेसच्या कव्हरेजदरम्यान या व्यक्तीला सहभागी का करून घेतले असा प्रश्न पडला. तसंच अनेकांनी यावरुन स्टार स्पोर्ट्स इंडियावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं.
हेही वाचा – ‘या’ बाबतीत अदानं आलियाला हरवलं! 100कोटींंच्या कमाईनंतर ‘या’ दिवशी OTT वर होणार रिलीज The Keral Story
एका कार्यक्रमादरम्यान हिंदू देवतांवर भाष्य केल्याचा आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असलेल्या फारुकीला जानेवारी 2021 मध्ये अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याची रवानगी मध्य प्रदेशातील इंदूर येथील तुरुंगात करण्यात आली होती. एफआयआरनुसार, 1 जानेवारी 2021 रोजी इंदूरच्या 56 दुकान परिसरातील एका कॅफेमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आता या प्रकाराचा तपास सुरू आहे. या प्रकरणी भाजप आमदार मालिनी लक्ष्मण सिंह गौड यांचा मुलगा एकलव्य सिंह गौड याने फारुकी आणि इतरांविरोधात तक्रार दाखल केली होती. “मी आणि माझे काही सहकारी एक कार्यक्रम पाहण्यासाठी गेलो होते. या कार्यक्रमात हिंदू देव-देवतांबाबत विनोद केले गेले. त्यानंतर आम्ही हा कार्यक्रम थांबवण्यास आयोजकांना भाग पाडले”, असं यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे.
त्यानंतर फारुकी आणि अन्य काही जणांना भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली शिक्षेस पात्र असलेल्या कथित गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आली होती. ज्यात कलम 295-A समाविष्ट आहे. हा कलम कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावनांचा उद्रेक करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक आणि द्वेषकारक कृत्यांशी संबंधित आहे. कोविड -19 महामारी दरम्यान परवानगीशिवाय शो आयोजित केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. तसेच त्याच्या आयपीसीच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सद्भाभावना वाढवणे हे घटनात्मक कर्तव्यांपैकी एक आहे, असं मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नमूद करत फारुकीला जामीन नाकारला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने 5 फेब्रुवारी 2021 रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत फारुकीची अंतरिम जामिनावर सुटका केली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की त्यांनी रद्द करण्याच्या याचिकेच्या गुणवत्तेवर भाष्य केलेले नाही आणि जर कोणतीही याचिका दाखल केली गेली तर ती कायद्यानुसार तिच्या गुणवत्तेच्या आधारे विचारात घेतली जाईल.
जामिनावर सुटल्यानंतर एका वर्षाने, रॅपर फारुकी ALT Balaji आणि Max Player चा रिअॅलिटी शो लॉकअपमध्ये विजयी ठरला होता. हा शो अभिनेत्री कंगना राणौतने होस्ट केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.