दिवसाचा सारांश: आजचं ‘ओरॅकल स्पीक्स’ सर्व 12 राशींसाठी लव्ह लाइफ, भाग्य या बाबतीत आज काय होऊ शकते, याची झलक देतं आहे. मेष राशीच्या व्यक्तींनी सुसंवाद आणि विश्वास जपण्यास प्राधान्य द्यावं. वृषभ राशीच्या व्यक्तींनी वैयक्तिक आव्हानांवर विजय मिळवत असताना नातेसंबंधांमध्ये स्थिरता शोधावी. मिथुन राशीच्या व्यक्ती नवीन नातेसंबंध जोडण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या व्यक्तींनी नातेसंबंधांत भावनिक नातं जोपासताना एकमेकांवर विश्वास ठेवण्यास प्राधान्य द्यावं. सिंह राशीच्या व्यक्तींचा उत्साह कायम राहील, रागावर नियंत्रण ठेवा. कन्या राशीच्या व्यक्तींनी लव्ह लाइफमध्ये नातं जपताना एकमेकांवर विश्वास ठेवावा. तूळ राशीच्या व्यक्तींनी नातेसंबंधात सुसंवाद ठेवावा. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी नातेसंबंधांतील विश्वास जिंकण्यावर आणि शांतता शोधण्यास प्राधान्य द्यावं. धनू राशीच्या व्यक्तींना लव्ह लाइफमध्ये यश मिळाल्यानं ते नव्या उंचीवर असतील. मकर राशीच्या व्यक्तीला वचनबद्धता आणि विश्वासाच्या आधारावर आपुलकी वाढवण्याची संधी आहे. तर, कुंभ राशीच्या व्यक्तीला दिवस प्रेम हे साहसाकडे घेऊन जाणारा राहील. मीन राशीच्या व्यक्तीला लव्ह लाइफमुळे शांतता लाभेल.
मेष (Aries)
तुमचं लव्ह लाइफ आज रोमांचक दिसतंय. तुमचा जोडीदार समजूतदार व पाठिंबा देणारा असेल. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा त्याचा नात्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. जेव्हा अनोळखी लोकांशी संवाद साधण्याची वेळ येते, तेव्हा स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा. संघर्ष टाळून सौहार्दपूर्ण उपाय शोधा. गैरसमज टाळण्यासाठी संवादात स्पष्टपणा ठेवणं फायद्याचं ठरेल. कुटुंबासोबतचं नातं अधिक घट्ट होण्यासाठी मुलांसोबत वेळ घालवा. वाईट सवयी सोडवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. भविष्यासाठी आर्थिक बचत करण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवा. गुंतवणूक करताना काळजी घ्या. संभाव्य नवीन गोष्टींवर लक्ष ठेवा. प्रथम विश्रांतीला प्राधान्य देतानाच स्वत:ची काळजी घ्या. नियमित विश्रांती मिळू शकेल, अशा पद्धतीनं स्वतःचं वेळापत्रक करा. आरोग्याच्या दृष्टीनं आवश्यक तयारी करून वेळप्रसंगी या क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकाचा सल्ला घ्या.
LUCKY Sign – A Heart Shaped Cloud
LUCKY Color – Bright Yellow
LUCKY Number – 2
वृषभ (Taurus)
तुमच्या लव्ह लाइफमध्ये आजचा दिवस हा स्थिर व शांतता आणणारा ठरेल. तुमचा जोडीदार तुम्हाला प्रोत्साहन देईल. अडचणींना तोंड देताना संयम ठेवून शांत राहण्यास प्राधान्य द्या. हे तुमच्यासाठी एका परीक्षेसारखे असले तरी शेवटी प्रामाणिकपणाचा विजय होईल. एखादा वाद सोडवताना एकमेकांशी खुलेपणानं बोलणं फायद्याचं ठरेल. नात्यात गैरसमज टाळण्यासाठी स्वतःच्या ध्येयांबद्दल स्पष्टपणे भूमिका मांडा. तुमच्या मुलांच्या भावनिक गरजांकडे लक्ष द्या. व्यसनाच्या वाईट सवयी सोडण्यासाठी प्रयत्न करा, यामध्ये यश येऊ शकते. आर्थिक स्थिरतेसाठी दीर्घकालीन नियोजनासाठी प्राधान्य द्या. कोणतीही महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यापूर्वी व्यावसायिकांचा सल्ला घ्या. भागीदारीच्या शोधात रहा. आरोग्याच्या दृष्टीनं निरोगी आहारासोबत शारीरिक ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हा. थकवा दूर करण्यासाठी सक्रिय राहा, पुरेशी विश्रांती घ्या. एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या.
LUCKY Sign – Shooting Star
LUCKY Color – Forest Green
LUCKY Number – 42
मिथुन (Gemini)
तुमच्या लव्ह लाइफमध्ये जोडीदारासोबत रोमांचक भेट होऊ शकते. तुमचा जोडीदार हा तुमच्या नात्यात आनंद आणेल. रागावर नियंत्रण ठेवण्यासोबतच संयम पाळा. इतरांवर विश्वास ठेवताना स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्यास प्राधान्य देणं फायद्याचं ठरेल. दीर्घकाळाचा संघर्ष टाळण्यासाठी आजच तडजोड करा. स्पष्ट संवादामुळे गैरसमज लवकर दूर होण्यास मदत होईल. तुमच्या मुलांसोबत स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये व्यस्त रहा. निरोगी सवयींवर लक्ष केंद्रित करून व्यसनांपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे. आर्थिक बाबतीत पारंपरिक दृष्टिकोन ठेवणं फायद्याचं ठरेल. आर्थिक गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मार्केट रिसर्च करा. अनपेक्षितपणे येणाऱ्या व्यावसायिक संधींवर लक्ष ठेवा. मानसिक आरोग्यासोबतच विश्रांतीला प्राधान्य द्या. निरोगी दिनचर्या ठेऊन आरोग्याच्या दृष्टीनं आवश्यकता असल्यास मेडिसिन घ्या.
LUCKY Sign – Clear Quartz Crystal
LUCKY Color – Off White
LUCKY Number – 44
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
लव्ह लाइफमध्ये प्रेम वाढण्यासोबतच नातं मजबूत होईल. तुमचा जोडीदार समजूतदारपणा दाखवत तुम्हाला भावनिक आधार देईल. रागावर नियंत्रण ठेवा. विश्वासानं समस्यांवर मात करा. वादावर स्वतःच्या हुशारीनं मात करून सुसंवाद साधत तडजोड करा. मात्र, स्पष्ट संवादामुळे गैरसमज वाढणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या मुलांची काळजी घेण्यासोबत त्यांच्याशी प्रेमानं वागा, त्यांना तुमचा वेळ हवा आहे. आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक ठरणाऱ्या सवयी व व्यसनांपासून मुक्त होण्यावर लक्ष केंद्रित करा. सूज्ञपणे आर्थिक निर्णय घेऊन त्यानुसार बजेट तयार करा. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी व्यावसायिक सल्ला घ्या. नवीन व्यवसायासाठी मिळणारा सहयोग एक्सप्लोर करा. स्वत:ची काळजी घ्या. संतुलित दिनचर्या आत्मसात करत पुरेशी विश्रांती घ्या. योगासारख्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हा.
LUCKY Sign – Aventurine
LUCKY Color – Cream
LUCKY Number – 12
सिंह (Leo)
तुमच्या लव्ह लाइफमध्ये नातं अधिक घट्ट होत असून आज प्रेमातील भावनिक व समर्पित भावनेचा अनुभव येईल. तुमचा जोडीदार तुमच्याबद्दल आपुलकी दाखवतानाच तुम्हाला पाठिंबा देण्यास आघाडीवर असेल. स्वतःचा आक्रमक स्वभाव नियंत्रणात ठेऊन शांत राहण्याचा प्रयत्न करा. प्रामाणिकपणा व स्पष्टपणे बोलून विश्वास कमवण्याची आज उत्तम संधी आहे. संघर्ष मुत्सद्दी पद्धतीनं हाताळण्यास प्राधान्य द्या. कुटुंबातील सदस्यांशी चुकीच्या पद्धतीनं संवाद करण्याचं टाळून तुमचा हेतू स्पष्टपणे मांडा. कुटुंबाचे मार्गदर्शक होऊन तुमच्या मुलांना प्रेम देण्यासोबतच प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घ्या. नकारात्मक सवयी व व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक परिस्थिती नियंत्रणात ठेवताना गुंतवणूक करण्यापूर्वी रिसर्च करा. नवीन व्यावसायिक भागीदारी होण्याची शक्यता आहे. स्वतःची काळजी घेण्यासोबतच विश्रांतीसाठी वेळेचे नियोजन करावं लागेल. निरोगी जीवनशैली ठेवा. एखादं औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
LUCKY Sign– A Majestic Bird
LUCKY Color – Purple
LUCKY Number – 10
शंभू-महादेवाच्या डोक्यावर चंद्र का असतो? सर्व देवतांनी केलेली ‘ती’ विनंती मान्य
कन्या (Virgo)
तुमच्या लव्ह लाइफमध्ये नात्यात भावनिक जवळीक निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार तुम्हाला आधार देईल. तुमचा स्वभाव नियंत्रणात ठेवून जोडीदाराला समजून घेऊन संयम ठेवा. इतरांवर विश्वास ठेवण्यापूर्वी स्वतःच्या वृत्तीवर विश्वास ठेवा. शांततेत निर्णय घेऊन संघर्ष टाळा. गैरसमज निर्माण होऊ नये, यासाठी स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडा. तुमच्या मुलांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. वाईट व्यसन सोवडण्यासाठी, तसेच त्यासाठी मदत मिळविण्याच्या दिशेनं पावलं उचलली जातील. आर्थिक खर्चाबद्दल सावधगिरी बाळगून आवेगपूर्ण खरेदी टाळा. महत्त्वपूर्ण आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी व्यावसायिक सल्ला घ्या. नवीन व्यवसाय संधीसाठी तयार करा. शारीरिक व्यायामावर लक्ष केंद्रित करून संतुलित दिनचर्या राखा. निरोगी जीवनशैली ठेवल्यास डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही.
LUCKY Sign – Tree of Life
LUCKY Color – Emerald Green
LUCKY Number – 19
तूळ (Libra)
तुमच्या लव्ह लाइफमध्ये प्रेम आणि सुसंवाद दिसेल. तुमचा जोडीदार तुमचं जीवन अधिक आनंदी व संतुलित करेल. नात्यातील संघर्ष टाळण्यासाठी शांतता राखा. विश्वास मिळवण्यासाठी मनमोकळ्या संवादास प्राधान्य द्या. तडजोड करून सौहार्दपूर्ण उपाय शोधा. कुटुंबातील सदस्यांशी गैरसमज टाळण्यासाठी, तुमचा हेतू स्पष्टपणे मांडा. तुमच्या मुलांसोबत वेळ घालवून त्यांच्या क्रिएटिव्हिटीला प्रोत्साहन द्या. वाईट सवयी सोडण्यासाठी, व्यसनांवर मात करण्यासाठी विविध ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हा. तुमची आर्थिक परिस्थिती नियंत्रणात ठेवा. कोणतीही महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यापूर्वी मार्केट रिसर्च करणे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणं फायद्याचं ठरेल. नवीन व्यावसायिक भागीदारीवर लक्ष ठेवा. स्वतःची काळजी घेण्यासोबतच विश्रांतीसाठी वेळेचं नियोजन करा. चालण्यास प्राधान्य देऊन निरोगी पथ्यं पाळा. तुमच्या दिनचर्येचं पालन करा.
LUCKY Sign – Peacock Feather
LUCKY Color – Orange
LUCKY Number – 15
तुळशीची पूजा करताना अनेकांच्या हातून या चुका होतात; नशिबाची नाही मिळत साथ
वृश्चिक (Scorpio)
तुमच्या लव्ह लाइफमधील भावनिक अनुभवांसाठी तयार रहा. तुमचा जोडीदार तुम्हाला मदत करण्यासाठी आघाडीवर राहील. नातेसंबंधांत अनावश्यक संघर्ष टाळण्यासाठी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. मनमोकळं व प्रामाणिक राहून विश्वासानं समस्यांवर मात करा. संघर्षावर तुमच्या हुशारीनं मात करण्यासोबत शांत राहण्यास प्राधान्य द्या. गैरसमज टाळण्यासाठी प्रियजनांशी स्पष्टपणे संवाद साधा. तुमच्या मुलांना प्रेमासोबतच पाठिंबा देऊन त्यांच्या विश्वासाला पात्र ठरा. आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक सवयी व व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत सतर्क राहून आवेगपूर्ण निर्णय टाळा. महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यापूर्वी व्यावसायिक सल्ला घ्या. नवीन व्यवसाय संधीसोबतच भागीदारी एक्सप्लोर करा. मानसिक, भावनिक आरोग्यास प्राधान्य देऊन संतुलित दिनचर्या राखा, व पुरेशी विश्रांती घ्या.
LUCKY Sign – Shooting Star
LUCKY Color – Grey
LUCKY Number – 99
धनू (Sagittarius)
तुमच्या लव्ह लाइफमध्ये रोमांचक व नवीन नात्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार तुमच्या स्वतंत्र विचारांना व स्वतःच्या विकासासाठी तुमच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देईल. संघर्षावर हुशारीनं मात करताना संयम ठेवा. मनमोकळा संवाद साधण्यासोबतच स्वतःवर आणि इतरांवर विश्वास ठेवण्यास शिका. शांततेत निर्णय घेऊन अनावश्यक संघर्ष टाळा. गैरसमज टाळण्यासाठी स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडा. तुमच्या मुलांच्या जिज्ञासेला प्रोत्साहन देऊन त्यासाठी कुटुंबात पोषक वातावरण निर्माण करण्यास प्राधान्य द्या. हानिकारक सवयी, व्यसनांपासून मुक्त होण्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या आर्थिक बाबतीत संतुलित दृष्टीकोन ठेवा. महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व पैलूंवर संशोधन करून विचारपूर्वक निर्णय घ्या. नवीन व्यवसायासाठी तयार राहा. शारीरिक व्यायाम करण्यासोबतच बाह्य ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हा. सक्रिय रहा.
LUCKY Sign – A Glass Bottle
LUCKY Color – Tangerine
LUCKY Number – 24
हनुमानाच्या गदेचे नाव काय? ती हनुमानाला कोणी दिली होती? कोणत्या धातूची आहे?
मकर (Capricorn)
तुमच्या लव्ह लाइफमध्ये नात्यातील स्थिरता व वचनबद्धता राहील. तुमचा जोडीदार तुमच्यासाठी आधारस्तंभ असेल. संयम ठेऊन समस्येवर हुशारीनं मात करा. मनमोकळेपणाने संवाद साधून विश्वास पुन्हा निर्माण करा. शांततेत निर्णय घेऊन अनावश्यक संघर्ष टाळा. गैरसमज टाळण्यासाठी तुमचे विचार व हेतू स्पष्ट करा. तुमच्या मुलांना मार्गदर्शन करून त्यांचा आधार बना. हानिकारक सवयी तसंच व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत मेहनती राहून आवेगपूर्ण खर्च टाळा. महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यापूर्वी व्यावसायिक सल्ला घ्या. नवीन व्यवसाय भागीदारीसाठी खुले व्हा. स्वत:ची काळजी घेण्यासोबत विश्रांतीला प्राधान्य द्या. संतुलित दिनचर्या राखून विश्रांती घ्या. आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
LUCKY Sign – A Monitor
LUCKY Color – Lilac
LUCKY Number – 13
कुंभ (Aquarius)
तुमच्या लव्ह लाइफमध्ये आश्चर्यकारक अनुभव येऊ शकतो. तुमचा जोडीदार तुमचा विश्वासू बनून तुमच्या अद्वितीय दृष्टिकोनाचं समर्थन करेल. संयम ठेऊन अनावश्यक संघर्ष टाळा. इतरांवर विश्वास ठेवताना स्वतःच्या प्रवृत्तीवर विश्वास ठेवा. शांततेत निर्णय घेऊन भिन्न दृष्टिकोन स्वीकारा. प्रियजनांशी गैरसमज टाळण्यासाठी स्पष्टपणे संवाद साधा. तुमच्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला प्रोत्साहन देऊन त्यांच्या स्वप्नांना पाठिंबा द्या. हानिकारक सवयी व व्यसनांपासून मुक्त होण्यावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक बाबतीत सतर्क राहून आवेगपूर्ण निर्णय टाळा. महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यापूर्वी व्यावसायिक सल्ला घ्या. नवीन व्यवसाय व सहयोगासाठी तयार राहा. मानसिक, भावनिक आरोग्यास प्राधान्य द्या. संतुलित दिनचर्या राखा. नियमित मेडिसिनचं सेवन सुरू ठेवा.
LUCKY Sign from above – Lantern
LUCKY Color – Coffee Brown
LUCKY Number – 16
श्रीरामावरून बाळाची ही छानशी नावे ठेवू शकता; यापैकी एक तुम्हाला नक्की आवडेल
मीन (Pisces)
तुमच्या रोमँटिक लव्ह लाइफ मध्ये एकमेकांच्या भावनांचा आदर करणे फायद्याचं ठरेल. तुमच्या जोडीदाराकडून तुमच्या नात्यात सहानुभूती, समजूतदारपणा येईल. धीर धरा, शत्रुत्वापेक्षा सहानुभूतीला प्राधान्य द्या. एकमेकांशी मोकळेपणानं राहून विश्वासाच्या चिंतेवर मात करा. सौहार्दपूर्ण उपाय शोधून निरर्थक भांडणांपासून दूर रहा. गैरसमज टाळण्यासाठी तुमच्या प्रियजनांना ध्येयांबद्दल स्पष्ट सांगा. कुटुंबावर कोणत्याही स्वार्थाशिवाय प्रेम करून त्यांना भावनिक आधार द्या. वाईट सवयी व व्यसन सोडण्याचा संकल्प करण्याची ही योग्य वेळ आहे. तुमची आर्थिक रणनीती योग्य ठेवा. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी रिसर्च करून मार्केटमधील परिस्थिती विचारात घ्या. नवीन व्यवसाय भागीदारी करताना मनमोकळे ठेवा. स्वत:ची काळजी घेण्यासोबतच निरोगी राहण्यासाठी पथ्य पाळा. क्रिएटिव्ह प्रयत्नांना प्रथम प्राधान्य द्या.
LUCKY Sign – A Paper Weight
LUCKY Color – A Milestone
LUCKY Number – 30
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.