प्रियांका माळी, प्रतिनिधी
पुणे, 17 मे : खेळ आणि खेळणी ही आपल्याला मुलांच्या जगात नेणारी माध्यमे! लहन मुलांसाठी तर तेच विश्व असतं. याच खेळण्याच्या माध्यमातून याच खेळण्यांच्या माध्यमातून मुलांना इतिहास समजला तर? खेळणी म्हणून साम्राज्यासाठी बलिदान देणारे पराक्रमी मावळे असले तर? असाच प्रश्न पुण्यातील दोन मित्रांना पडला आणि त्यांना एक भन्नाट कल्पना सुचली. त्यांनी इतिहासातील शूरवीरांच्या हुबेहूब प्रतिकृती असणारी खेळणी साकारली. प्रेरणादायी विचाराने सुरू केलेल्या या त्यांच्या स्टार्टअपला जोरदार यश मिळालंय.
खेळण्याच्या विश्वात इतिहास
तुमच्या शहरातून (पुणे)
पुण्यातील केदार सातपुते आणि अमोल कुलकर्णी या दोन मित्रांनी ‘निर्माण टॉईज’ या नावाने हा स्टार्टअप 2021 साली सुरू केला. . केदार सातपुते हे मॅकेनिकल इंजिनिअर आहेत. अमोल कुलकर्णींचं फाईन आर्टमध्ये शिक्षण झाले आहे. सातपुते गेली 15 वर्षे आयटी कंपनीमध्ये कार्यरत आहेत तर कुलकर्णी यांची 12 वर्षांपासून डिझाईन फर्म आहे. त्यानंतरही आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची जिद्द आणि त्याला भव्य उद्देशांची जोड देत त्यांनी स्टार्टअप क्षेत्रात उडी घेतली. हे स्टार्टअप सुरू केल्यानंतर अगदी कमी कालावधीतच त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
तुम्ही खात असलेली सॉफ्टी नेमकी कशी बनते? पुणेकराने दिली खास माहिती, VIDEO
‘छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास लहान वयातच मुलांच्या मनावर बिंबवला जावा. मावळ्यांच्या प्रेरक गोष्टी, त्यांचं स्वराज्यामधील योगदान टॉईजच्या माध्यमातून मुलांना कळावा हा या ‘निर्माण टॉईजचा’ उद्देश आहे, ‘ असं त्यांनी स्पष्ट केलं.
‘अनेक लहान मुलं ही सतत मोबाईलमध्येच मग्न असतात. त्यांना स्पायडर मॅन, थॉर यांच्या काल्पनिक कथा तोंडपाठ असतात. मात्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाची नीट माहिती नसते. मुलांनी आभासी जगातून बाहेर पडून खऱ्या जगात यावं हा खेळणी बनवण्याचा हेतू आहे, असं सातपुते आणि अमोल यांनी सांगितलं.
अवघ्या 10 वर्षांच्या मुलांसोबत हजारो फूट उंचावरून घेतली उडी, पुणेकर शीतलची थरारक कहाणी
लवकरच नवी पर्वणी
मुलं या खेळण्यांंमध्ये रमतात. त्याबद्दल कुतूहलानं प्रश्न विचारतात, तेव्हा पालक मुलांना त्या शूरवीरांच्या कहाण्या समजावून सांगतात. या देवाणघेवाणीमुळे मुलांमध्ये इतिहासाची गोडी निर्माण होते. त्यांच्या संस्कारक्षम मनावर आपोआपच मराठी संस्कृतीचे संस्कार होतात. पालकांकडून या खेळण्यांना प्रचंड मागणी आहे. येत्या काळात खास मुलींना केंद्रस्थानी ठेवून इतिहासातील स्त्री योद्ध्यांची प्रतिकृती साकारणारी खेळणी बनवणार आहे, अशी माहिती केदार सातपुते यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.