मुंबई, 17 मे : कर्जत व जामखेड तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसी वरुन आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले आहे. दोन्ही तालुक्यांसाठी महत्त्वाच्या असेलल्या या एमआयडीसीबद्दल शिंदे सरकारने अद्याप अधिसूचना जारी केली नाही. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारलं फटकारलं आहे. यावेळी मतदारसंघातील लोकांसाठी उपोषण करण्याचा इशाराही पवारांनीही दिली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
शिंदे-फडणवीस सरकारकडे वारंवार पाठपुरावा करुनही कर्जत-जामखेड एमआयडीसीबद्दल अधिसूचना काढली जात नाही. यावरुन रोहित पवार यांनी स्मरणपत्र आणि फोटो पोस्ट करत ट्विट केलं आहे. पवार म्हणाले, की “वारंवार स्मरणपत्र देऊनही राजकीय द्वेषामुळे माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीची अधिसूचना सरकार काढत नाही. त्यामुळं स्मरणशक्ती वाढावी म्हणून सरकारला च्यवनप्राश देण्याची आणि प्रसंगी माझ्या मतदारसंघातील युवा आणि नागरिकांसाठी उपोषण करण्याचीही माझी तयारी आहे.” त्यामुळे भविष्यात पवार आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील संघर्ष वाढू शकतो.
तुमच्या शहरातून (मुंबई)
वारंवार स्मरणपत्र देऊनही राजकीय द्वेषामुळे माझ्या मतदारसंघातील #MIDC ची अधिसूचना सरकार काढत नाही. त्यामुळं स्मरणशक्ती वाढावी म्हणून सरकारला च्यवनप्राश देण्याची आणि प्रसंगी माझ्या मतदारसंघातील युवा आणि नागरिकांसाठी उपोषण करण्याचीही माझी तयारी आहे.@mieknathshinde@samant_uday pic.twitter.com/lz8FTIVbGx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 17, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.