सोनिया मिश्रा (उत्तराखंड), 07 मे : भारताच्या उत्तरेतील जम्मू काश्मीर, लेह लडाखसोबत उत्तराखंडची सीमा ओलांडली की नेपाळ, चीन, आणि पाकीस्तानला जाता येते. या सीमा पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. दरम्यान उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात भारत-चीन सीमेजवळ ‘हिंदुस्थानचे शेवटचे चहाचे दुकान’ आहे. जे बद्रीनाथ धामपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आहे. उत्तरेतील चीनच्या सीमेवरील पहिलं गाव म्हणजे माना हे आहे. बद्रीनाथला येणारे सर्व भाविक भारतातील शेवटच्या चहाच्या दुकानात एक घोट घेतल्याशिवाय राहू शकत नाहीत. दरम्यान या दुकानाचे नाव ऐकुनही लोक आश्चर्यचकीत होत आहेत.
चहा आणि मॅगीचा आस्वाद घेण्यासाठी हजारो लोक या ठिकाणी येत असतात. दरम्यान येणारा प्रत्येकजण येथे सेल्फी घेत असतो यामुळे हा सेल्फी पॉइंट म्हणून देशभरात प्रसिद्ध झाला आहे. येथील स्थानिक सुनील काला सांगतात की, हे दुकान 3118 मीटर उंचीवर आहे मागच्या 25 वर्षांपूर्वीपासून हे दुकान सुरू आहे. या दुकानाचे मालक चंदर सिंह बडवाल असे नाव आहे. मागच्या 25 वर्षांपासून ते भारताचे शेवटचे चहाचे स्टँड बनले आहे. हे दुकान चीनच्या सीमेपासून काही मीटर अंतरावर आहे.
दादर आता विसरा, डोंबिवली सारखं स्वस्त मार्केट कुठेच नाही! कसं ते पाहा हा VIDEO
माना गावाचे जुने नाव मणिभद्रपुरम होते महाभारतातील पांडव स्वर्गाकडे याच ठिकाणाहून गेले असल्याची चर्चा आहे. याचा पुरावाही त्या ठिकाणी आहे या ठिकाणी भीम पूल आहे तो भीमाने बांधल्याचे सांगितलं जातं. यापूर्वी ते भारतातील शेवटचे गाव म्हणून सांगितलं जायचं आता भारतातील पहिले गाव म्हणून नाव देण्यात आले आहे.
या गावाचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व पाहून शासनाने या गावाला पर्यटन गावाचा दर्जाही दिला. या दुकानावर एक बोर्ड आहे, ज्यावर ‘हिंदुस्तान के आखिरी चहाच्या दुकान में आपका हार्दिक स्वागत है’ हिंदीसह भारतातील 10 भाषांमध्ये लिहिलेले आहे.
French Fries : जास्त फ्रेंच फ्राईज खाल तर नेहमी राहाल निराश, वाढेल ‘या’ आजाराचा धोका
रस्त्याने माना गावात जाण्यासाठी आधी बद्रीनाथला पोहोचावे लागते आणि बद्रीनाथपासून 3 किमी अंतरावर माना गाव आहे. जिथून गावात प्रवेश करून काही अंतर चालत गेल्यावर दुकान आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.