मुंबई, 18 मे : आजही पृथ्वीवर अशा अनेक वस्तू आहेत, ज्यांना देवांचे वरदान मानले जाते. यापैकी एक म्हणजे पारिजाताचे झाड. घरामध्ये पारिजात रोप लावणे खूप शुभ मानले जाते. देवी लक्ष्मीला त्याचे फूल खूप आवडते, असे मानले जाते. समुद्रमंथनाच्या वेळी जी 14 रत्ने बाहेर पडली, त्यापैकी पारिजाताचं रोपही होतं अशी पौराणिक मान्यता आहे. या वनस्पतीची स्थापना इंद्राने स्वर्गात केली असे मानले जाते.
पारिजाताची फुले देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय मानली जातात. किंबहुना, असे मानले जाते की देवी लक्ष्मीचा अवतार देखील समुद्रमंथनाच्या वेळी झाला होता. पारिजाताची वनस्पती आजही पृथ्वीवर आहे. या वनस्पतीला पृथ्वीचे वरदान म्हणतात. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पारिजात वनस्पती असणे खूप शुभ मानले जाते. पारिजात वनस्पती घरी ठेवण्याचे फायदे जाणून घेऊ.
लक्ष्मीला खूप प्रिय: ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा यांच्या मते, पारिजातचे फूल देवी लक्ष्मीला खूप आवडते. असे मानले जाते की, ही वनस्पती घरात लावल्यानं धन आणि धान्याची पूर्ती होते. घरामध्ये पारिजात रोप लावल्यानं घरात शांतता राहते.
सकारात्मक ऊर्जेचा प्रसार : घरामध्ये पारिजात रोप लावल्यानं सकारात्मक उर्जा पसरते. यामुळे नकारात्मकता दूर होते. याच्या फुलांच्या सुगंधाने मन शांत होते आणि तणावातूनही आराम मिळतो.
घरात पितृदोष असल्यास वेळ नका घालवू; अशुभ घडण्यापूर्वी हे उपाय करून घ्या
आरोग्य फायदे: असे मानले जाते की, पारिजात वनस्पती घरात लावल्यानं कुटुंबातील लोकांचे आरोग्य चांगले राहते आणि त्यांना दीर्घायुष्याचे वरदानही मिळते. धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त आयुर्वेदात पारिजात वनस्पती आणि फुलांचा वापर केला जातो. आयुर्वेदात पारिजात फुलांपासून अनेक प्रकारच्या रोगांवर औषधे बनवली जातात.
अशी स्वप्नं पडणं शुभ संकेत असतात! देवी लक्ष्मीच्या कृपेनं धनलाभ होण्याचे योग
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.